Posts

Showing posts from May, 2021

माझी बहीणाबाई

*माझी बहीणाबाई.....!!* *जेवढे कठोर तिचे बोलणे पण मनातून अगदी सौम्य अन् भावना समजून घेणारी, अगदी मस्तीखोर अन् भांडण म्हटलं कि त्यात पहिलाच नंबर ते फक्त आम्हा दोघांसोबत(मी अन् माझा भाऊ) आणि आजीशी तर नेहमीचीच लढाई चालू असते, त्यामुळे कधी मधी वाटते कि भारत-पाक च युद्धच चाललंय जणू. कारण जास्त मोठ्ठ नसतंच पण तरीही भांडण करण्यात पटाईत. माझ्या घरातील एकमेव कार्टून अन् माझ्यासाठी जणूकाही डोरेमॉन. कारण प्रत्येक गोष्टीवरनं हासून देणारी ती पण बर्याचदा वाटते कि तीच माझी मोठी बहीण आहे. हसून हसून पुरेवाट घायाळ करणारीच ती पण जीवन जगण्याची रीत मात्र न्यारीच, अनेकदा बोलताना सहज बोलून जाते अन् त्यातून हसायलाही भाग पाडते पण एक मेसेज मात्र कुठला ना कुठला नक्कीच देऊन जाते. माझ्या घरची ती जणू कॉमेडीची बुलेट ट्रेन च आहे, त्यातून कधी मधी राग ही ती आणून देते, एकदा असंच माझं नि तिचं भांडण झालं आणि एक धपाटा तिला द्यायला गेली तर काय ...?? तिनेच हास्यस्फोट करून मलाच खाली पाडलं...!! असो हा झाला गमतीचा भाग...!! एक मुलगी म्हणून जगताना मला अनेक गोष्टी तिच्याकडनं शिकायला मिळाल्यात.बर्याचदा ती तिच्या बॅगमध्ये चटणीची डबी ...

मासिक पाळी अन् ती...

Image
*बर्याचदा एक भीती मनात होती आधी, कुणाला सांगायचं म्हटल्यास मनात guilty वाटत होतं, ते म्हणजे "पाळी" विषयी....!! शाळेत असताना तर चक्क काही मुली महीन्याची ती तीन -चार दिवस तर unlock च असायच्यात आणि त्यांना विचारलं तर सांगत पण नव्हत्यात..... परंतु बर्याचदा त्याचं कारण हे पाळी हेच असायचं. कारण त्या वेळी होणारा त्रास हा असहनीय असतो....पण तरीही तो सहन करणं चालू असतं, का ....?? तर एक आनंद अन् अभिमान बाळगून कि, ह्या मुळेच आम्हा मुलींना स्त्रीत्व बहाल झालंय नि पुढे जाऊन यामुळेच आम्हाला मातृत्व देखील प्राप्त होणारेय. पाळी आल्यानंतर चा तो काळ हा थोडा कठीणच जातो....ते रक्त डोळ्यांसमोरून जाताना जेव्हा दिसतं तेव्हा थोडं विचित्र वाटतं पण तरीही ते बघण्यातही एक आत्मीयता असते....कि..."Yes....!! I am not just a girl, I am the girl.....!!" आणि ते वारंवार पॅड,कापड बदलवणं ही ....हा सारी खटाटोप त्यावेळी एका महीलेला करावी लागते....!! हे सर्व असताना ती स्वत:सोबतच आपल्या जिवलगांची काळजी घेत त्यांना प्रेम बहाल करायला मात्र कधीच मागे येत नाही..हेच तिचं मोठेपण.!Godspeed to each and e...
एकदा काय झालं....?? असंच आम्ही दोघे मस्तपैकी गप्पा मारत बसलो होतो...तेव्हा मी माझ्या राधेला सहज एक प्रश्र्न विचारला...."राधे....हे राधे....!! का गं मी तर एवढा सुंदर नाहीये पहायला शिवाय शरीरयष्टी पण तेवढी माहोल नाहीच ए मुळी, तरी तु माझ्यावर जिवापाड प्रेम करतेस...का असं...?? आजची परिस्थिती बघून विचारलेला हा प्रश्र्न. त्यावर माझी राधा बोलली...अरे Krishna तुला माहीतेय ना...!! आज तु सुंदर दिसतोय, कदाचित उद्याही दिसशील ...पण काही काळानंतर तुझं सौंदर्य काय नि माझं काय ....हे जाणारच आहे नि त्यात तिळमात्र ही शंका नाही आहे.मग का म्हणून मी तुझ्या बाह्य सौंदर्यावर प्रेम करावं बरे...! आणि हो मी तुझ्या दिसण्यावर कधीच प्रेम केलेलं नाही रे पगलू, मी तर तुझ्या असण्यावर प्रेम केलंय, मी प्रेम केलंय ते तुझ्या गोड अन् प्रेमळ स्वभावावर, मी प्रेम केलंय ते तु माझ्यावर ठेवलेल्या विश्वासावर अन् प्रेम केलंय त्या तुझ्या वेडेपणावर, जो तु मला कायमच समजून घेतोस, आणि दोघांत काही भांडण झालंच तर मला दोष न देता...त्यामागचं कारण काय ह्या कलेवर ....!! हे बोलून एक स्मितहास्य देत तिने ती दिलेली ती एक गोड मिठी अन् तिचं त...

रात्र चांदणी त्यात मी अन् ती ❤️......!!

Image
शांत रात्रीत अगदी तुलाच शोधत होतो सखे, अन् विचार करत होतो, कदाचित तु सोबत असतेस तर तुला ही चांदण्यांची रात्रच अख्खी बहाल केली असती बघ....!! निळ्या निळ्या या आकाशात चमकणार्या तार्यांचा हा प्रकाश अन् सोबतीला चंद्र हाच तो काय पसारा, पण माझ्या या आयुष्याच्या वाटेवर माझा पसारा सांभाळत थोडं मला समजण्याचाही विचार केला असता तर मी तुला माझं सर्वस्व बहाल करीन बघ.....!! अमावस्या अन् पोर्णिमा यात जसा ताळमेळ तसाच माझ्या जीवनातील सुख-दु:खाला पचविण्याच्याची तु ती ताकद, या चांदण्या राती कधी दु:खाने भिजलेला मी अन् तु तेव्हाच्या सुख नामक वार्याची ती झुळुक, अन् या रातीतील मी राग तर तु त्यातील सुर झलीस तर आयुष्याचा परीस मी होईल बघ‌‌.....!! -भाग्यश्री उमेश काळे

निळ्या आकाशाची चादर ओढून घेताना.......

Image
जोडी तुझी नि माझी जणू असो चंद्र नि तार्यांसारखी, ज्यात मी तुझा चंद्र अन् तु माझी सावली बनशील...!! माझ्या शांत अन् नीरवपणात तु मला लाभली जणू तारकांसारखी, मी तुझ्यात मला शोधेन अन् तु जमल़ तर मला शोधून बघशील....!! मऊगार वातावरण हे अन् त्यात तु लाभली ऊबेसारखी, चंद्राच्या छायेत नीजताना स्वत:त हरपून जाऊन प्रेमाचा तु मग वर्षाव करशील....!! -भाग्यश्री उमेश काळे
काही नव्हतं तरीही ती खुश होती, पण मेहनत करण्याची तिची धमक मात्र जबरदस्त होती, अशी माझी दुसरी माय माझी आजी होती....!! आज जरी ती आमच्यात नसली तरी ती विचाराने नेहमीच सोबत आहे. तीने दिल्येला शिकवणीचे बीज मनात पेरले गेलेले आहेत,जे एक सर्वांगीण मुलगी बनण्यासोबतच एक आदर्श मला बनवेल, ही खात्रीय. जरी ती खुप श्रीमंत नव्हती पण मनाने भरभरून देणारी होती. तुझ्याकडे येतेय म्हटलं कि, तिचं ते वाट पाहनं हे खुप कम्मालीचं म्हणजे....!! आली का...?? आली का ....?? म्हणत आजोबांना मला फोन करण्याचा तो तिचा हट्ट म्हणजे तर नादचखुळा...!! आणि त्यातही मी मोठी म्हणून माझ्यात तिचा कायमच खुप जीव होता. म्हणुनच कि, काय...?? मलाही तिथं जाणं फार आवडायचं.  उन्हाळा लागला रे लागला कि माझा मुक्काम हा ईथेच म्हणजे माझ्या मामांकडे ठरलेलाच असायचा. खरं म्हणजे बरेचजण "माझ्या मामाच्या गावाला चाललोय" असं उत्तर असायचं; पण मला जर कुणी, कि का गं....?? उन्हाळ्याच्या सुट्टीत कुठे जाणार आहे....?? तर माझं ठरलेलं उत्तर असायचं...ते म्हणजे, "मी आजी-आजोबा कडे जाणार आहे. त्यामुळे माझी आणि आज्जीची थोडी जास्तच जवळीक वाढली होती, तिच्या...
संतांनी उभ्या आयुष्यात एकंही पाप केलेलं नसून तरीही त्यांना लोकांचा त्रास सहन करावा लागतो तर मग आपण कोण आहोत हो.....?? आपण तर आपल्या सुखासाठी अन् स्वार्थासाठीच बर्याचदा जगत असतो तर आपल्याला त्रास तर सहन करावाच लागेल नाही का....??

एक हट्ट तिच्याकडे

Image
*सखे....*♥️ *तु सुखात माझ्या सोबत नसले तरी चालेल गं, तुझ्या आठवणीत आनंद मानेल मी....* *पण दु:खाचा डोंगर सर करताना माझी साथ तु देशील का गं.....?? तुझ्या खंबीर विचारांच्या सोबत असण्याने तो ही पार करेल मी....!!* *-#BK*

सहवास.....!!

Image
सहवास हा खूप गमतीदार आहे हो....नाही का....?? पण प्रत्येकाकडेच हा सहवास प्रेमाचा, सहवास मैत्री प्रेमाचा, असेलच असे नाही मग तो किंवा ती कुढत असते बिचारे ते, कुणाचा तरी प्रेमाचा सहवास मिळेल पण ....पण .....!! मिळेल की नाही या संभ्रमात आयुष्याची काही वर्षं निघून जातात परंतु जगातील सर्वात सुंदर व्यक्तीचा सहवास आपल्याला कायमच असतो हे कुणाच्या तरी सहवासाच्या शोधात मात्र विसरून जातो. म्हणूनच म्हणतो कोणाच्या दुसऱ्याच्या सहवासात राहायच्या आधी स्वतः आनंदाने हसत मुखाने अनुभव घ्यावा म्हणतो जगातील सर्वात प्रेमळ व्यक्तीशी सहवास लाभल्यासारखे वाटेल आणि जगण्याचा आनंद लुटता येईल भरभरून. जरुरी नाही की प्रत्येकाकडेच मन रितं करण्यासाठी आपल्या हक्काचं घर किंवा आपल्या हक्काची जागा असेलच म्हणून कुणाच्या तरी मनात. कुणाच्या तरी ओठी आपल्यासाठी प्रेमाचे दोन गोड बोल असेल याची काहीच खात्री पटवून देता येत नाही. जास्त काही नाही तर चेहऱ्यावर एक गोड स्माईल मात्र नक्की ठेवावी इतरांसाठी हे जाणून घेऊन कि, आपल्याला प्रत्येकाला आनंदी ठेवण्याचा भलंमोठं काम नाही जमणार आहे म्हणून....!! नसतं हो कुणाकडे, कुणीतरी आपली स...

हृदयीचे शब्द......

Image
दु:खाने त्रासून गेलेल्या व्यक्तींना आशेचा अनमोल किरण दाखवत, हास्याचे दर्शन करण्यासाठी असलेले छोटेखानी पण ह्रदयीचे दोन गोड शब्द फार मोलाचे ठरतात. जास्त काही अपेक्षा नसते हो तेव्हा जेव्हा खूप एकटं वाटत असेल,मन दु:खाने गच्च भरलेलं असेल पण हवी असते शब्दांची चाहूल अन् प्रेमाची गोड मिठी आपल्या व्यक्तींची आणि म्हणूनच असेल हो.... केव्हाही मन नाराज असेल, तेव्हा मनातून वाटतं की, आपल्या जवळची व्यक्ती सोबत बोलावं. असं असताना तेव्हा केवळ त्यांचा आवाज कानी पडला ना तरी ते आभाळाएवढं असतं. म्हणूनच तर म्हटलं जातं भाषा व बोलणं हे असं असावं कि जे या हृदयीचे त्या हृदयी पोहोचेल. कदाचित हेच कारण असावं काही व्यक्तींच्या केवळ बोलण्यावर मन मोहून प्रेमात पडतात काही माणसे. खूप हळवी असतात ती मने जी शब्दांनी तुटली जातात पण त्याहूनही अधिक खास असतात ती मने जी शब्दांनी जोडली जातात म्हणून म्हणतो, शिकावं ते बोलणं जे हळव्या मनाला आपलंसं करेल, म्हणूनच म्हणतो शिकावी की बोलण्याची लतब जी दुखी मनाला ही दुःखातून चटकन बाहेर काढत आपलंसं करेन. बऱ्याच जणांना बरेचदा प्रश्न पडतो की काहीजण एखाद्याचे कसे काय एवढ्या लवकर जि...

आधी प्रेम स्वत:वर......

Image
*सर्वांत आधी स्वत:शी प्रेम करायला शिकलो ना तर मग कठीण नाही वाटत काही काळ एकटं राहणं. कारण कसंय ना....?? No one is permanent in the life. मग हे माहीत असतानाही आपण कुणाला कधी एवढा जीव लावून बसतो अन् काही झालं कि मग त्रास हा ही स्वत:लाच होतो, त्यापेक्षा जीवन जगताना Short & to the point हे तत्व स्विकारलं ना तर आयुष्य थोडं अजून सुखमय होऊन जातं. पण आपल्या जिवलगांना मात्र फार आत्मीयतेने जपावं कारण शेवटी तीच आपल्याला यशापयशात धीर देणार आहेत. काही असो जीवनात एक कला मात्र शिकायला हवी माणसाने "गर्दीतील आपली माणसे ओळखण्याची" सदाबहार हास्य मिळाल्यासारखं वाटेल.......!!* *(#BK)*

The glory.....!!

Image
*One of the best moment in the life is to live the life with this Glory which are books. There are nothing misunderstanding will occur but always helps us to level up day by day. Books are the real lifetime partner who always gives us silver ray of hope to do more and be the better version of yourself. The glorious things which we got from books that were coming from the experience of the different people, because our life is too short to live by taking small small experience and learn. But these books are the Treasure of positivity and experience which gives a mind-blowing push up as well helps us to be strong by thoghts. "Take one and one experience and go ahead to achieve your dream" it's a bold truth which is indirectly given by them.........!* *(#Bk)*

माझी एक निराळी सखी.....

Image
*सर्वांत भारी आणि प्रत्येक गोष्ट अन् भावना इथे secret ठेवता येतात. न भीती असते ती भावना ह्या कुणाला माहिती पडण्याची, न भीती असते ती आपला weakness कुणाला माहीत झाल्यावर बखेडा उभा राहण्याची......फक्त अन् फक्त एक शांतता असते अन् समाधान असतं भावना मनमोकळेपणाने मांडता येण्याची. मग सांत्वन मिळो अथवा न मिळो पण आपण कुठे चुकलो याची जाणीव होत ती सुधारण्यासाठी एक सुवर्ण संधी मात्र ही नक्कीच बहाल करते. कारण जरूरी नसतं कि प्रत्येकजण आपल्या भावना रडून इतरांना सांगत असतील म्हणून, शेवटी भावना ह्या सर्वांनाच असतात पण त्यांना मनमोकळं करण्याची रीतभात मात्र तर्हेतर्हेची.....!!(#BK)*♥️

"प" पाळीचा.....

Image
*"प" पाळीचा.....* *कधी कधी तर राग येतो कि, यार आपण science शिकतोय पण तरीही याबद्दल हवी तेवढी जागरुकता नाहीएत. म्हणून वाटतं आता "प" पतंगीच्या ऐवजी "प" पाळीचा शिकवायला हवा. साधी गोष्ट पकडायची झाली ना, जेव्हा आम्ही विज्ञानात "menustral cycle" हा भाग शिकतो तेव्हा हा भाग सप्पा गाळलाच जातो, जर शिकवायला शिक्षक असलेत तर झालं रे झालं...मग ती diagram रट्टा मारता मारता दम निघून जातो पण exactly ती प्रोसेस कशी आहे हे अजूनही पुर्णपणे कळालेलं नाहीएत.....का...?? तर अजूनही तो एक गैरसमज म्हटला तरी वावगं ठरणार नाही. कारण ९,१०वी आणि आता १२ वीत आलेय पण आम्हाला ती प्रोसेस खुलके अजूनही सांगितली नाही. सर्वांना ही गोष्ट माहीती असूनही मग काहीच माहिती नाहीएत असं का केलं जातं असावं, त्याबद्दल अधिक जागरूकता का नाही आणावी...?? पाळी येणे ही स्त्रीयांच्या जीवनातील एक अति आवश्यक अशी प्रोसेस आहे. मग तरीही तिलाच याबद्दल बरीचशी माहिती नाही अजून, हीच मोठी शोकांतिका आहे. खरं म्हणजे चुक तिची नाहीएत हो अन् चुक त्याचीही नाहीए जो बर्राचदा उत्सुक असतो यासर्वांबद्दल जाणून घ्याय...

प्रेमाचं भांडण..

Image
*ते कधी मधी केलेलं प्रेमाचं भांडण..........!* *खरं म्हणजे त्या आपल्या प्रेमळ व्यक्तीसोबत केलेलं भांडण ना हे लयभारी असतं राव. कारण कसंय ना....?? त्या आपल्यातील आपल्या व्यक्तींशिवाय आपल्याला कुणी नाही हो सांभाळून घेऊ शकत. कारण आपला सगळा राग झेलून घेण्याची भलीमोठी जादू त्यांच्यामध्ये असते बरं का....?? अन् त्यातून जो आनंद मिळतो तो तर जगावेगळा असतो.*  *प्रत्येकालाच वाटत असतं कि आपल्या आयुष्यात कुणीतरी असं यावं जे आपल्याला खूप खूप जपेल, आपल्यावर अतोनात प्रेम करेल ज्यात कुठलाही स्वार्थ नसेल, आपल्या सोबतच आपल्या मनालाही अन् मनाच्या आनंदालाही फार फार जपत काळजाचा एक तुकडा आहे नव्हे नव्हे तर काळीजच तु आहे असं म्हणत कायम हातात हात धरून कधी प्रत्यक्षपणे तर कधी अप्रत्यक्षपणे कायमच पाठीराखा राहील. काही असो मना शेवटी "लक" हा फैक्टर ही अति इंपॉर्टेंट वाटतो मग मलाही कधी कधी. पण काही असो आपण जर स्वच्छ अन् नितळ मनाने जर चालत गेलो तर एक ना एक दिवस ती व्यक्ती मिळाल्याबिगर राहत नाही.* *अरे हे सांगता सांगता मुळ मुद्दा विसरलीच राजे हो मी.....!! प्रश्र्न हा आपल्या व्यक्तींसोबत प्रेमाच्या भ...

हक्क .....

Image
⚜️कधी कधी वाटतं कि यार विनाकारण आपण कुणावर हक्क दाखवतोय, हे आपण तेव्हाच करत असतो जेव्हा थोडंफार वाटते आणि दिसते ही कदाचित समोरची व्यक्ती आपल्यावर हक्क दाखवतेय आपल्या चांगल्यासाठी. मग ती ही आपल्या हक्काची व्यक्ती समजून हक्क दाखवण्याचा अगदी थोड्या प्रमाणात जरी तो दाखवण्याचा प्रयत्न केला तर ती समोरची व्यक्ती दुखावली जाते कधी कधी. मग तेव्हा अचानक लहानपणी जसं खुर्चीवर बसल्यावर मागून फटके दिल्यावर जसा झटका लागतो ना अगदी तशीच चमक पडते, हे काय वेडेपणा करतेय तु..?? सर्वांत हक्काची व्यक्ती जर कुणी असेल ना तर ते आपण स्वत:च आहोत. कितीही स्वत: ला रागवा, कितीही चिडा, कितीही रडा आणि कितीही खळखळून हसा, स्वत:च स्वत:च भलंमोठं Platform बना, जे आपल्याला आतून कणखर अन् बलशाली बनवेल. ⚜️ -भा.उ. काळे

कटू सत्य......

Image
एकदा राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत Participate केलं होतं, मी तेव्हा नववीत होते. ती स्पर्धा ही खुल्या वयोगटातील होती, "माझी कन्या भाग्यश्री" या योजनेअंतर्गत राबवल्या गेली होती. एक मुलगी म्हणून मुलींच्या जीवनात येणार्या अनेक समस्यांची मांडणी निबंधात केली होती, पण तरीही तेवढं पुरेसं नव्हतं, त्याला हवे असलेले शब्द नियमांच्या अटीत कदाचित बसले नसावे, विचारांना थोडी फार speed होती पण हाताला नव्हती. त्यामुळे अपयश आले आणि बक्षीसही मिळालं नाही. त्यानंतर परत आल्यावर आमच्या मुख्याध्यापिका मॅडम नी विचारलं, मॅडम फक्त एक गुरू म्हणूनच नव्हे तर एक मैत्रीण म्हणून पण लाभलेल्या होत्या, कारण जीवन जगताना आलेल्या प्रश्नांना अचूक उत्तर अन् उपायही त्या मला वेळोवेळी योग्य मार्गदर्शनसह देत होत्या,मॅडमनी मला मग विचारल़, का गं स्पर्धा कशी झाली...?? आणि एवढी उदास का आहेस, मग माझं त्यावरचं उत्तर.... मॅडम मला बक्षीस नाही हो मिळालं. तिथे माझ्याहीपेक्षा वयाने आणि विचारांनीही मोठी अशी स्पर्धक होती. आणि हो मॅडम मी तिथे कमी पडली. मॅडम मला शांतपणे समजावून सांगत होत्या आणि मी ही ते सर्व मन लावून ऐकत होते...

काय राजे हो.....!!

Image
काय राजे हो.......!! खरं म्हणजे आपण लहानपणापासनंच कुणाच्या ना कुणाच्या विचारांच्या पगडीखाली चिरडलो भरडलो जातो, कधी आई-बाबांच्या तर कधी नातेवाईकांच्या, वेळ आलीच तर शेजार्यापाजार्यांच्या.....आणि सर्वांत महत्वाचा पगडा जो असतो तो म्हणजे प्रथा- परंपरेचा.....!! कधी कधी अन् बर्याचदा मग वाटायला लागते कि यार आपण कुठेतरी चुकीच्या ठिकाणी तर जन्माला नाही ना आलोय....तर हळूच उत्तर येते 'ना____ही' चुकीच्या ठिकाणी नाही तर चुकीची माणसिकता असलेल्या ठिकाणी जन्माला आलोय आपण कि जिथे कधी स्वत:च्या विचारांनी जगायला पाप माणनारे लोकं आहेत. असो शेवटी ज्याचे त्याचे विचार......! पण असं आपले विचार कुणावर लादणं योग्य नाही हो, जिथे अनेक मने तुटली जातात, जुळलेली अनेक प्रेमाची नाती अन् प्रेमसंबंध ही अर्धवट तयार होता होता राहून जाते, मनात तयार झालेलं एक सुंदरसं घर तयार झाल्यानंतर त्याला केवळ मोठ्यांच्या आशीर्वादाचा गिलावा जो असतो तोच मिळत नाही....!! पण शेवटी महत्त्वाचं हे आहे कि संसाराची गाडी योग्य चालावी यासाठी ती दोन चाके अतिमहत्त्वाची असतात, केवळ महत्त्वाचीच नसतात तर तिथे महत्त्वाचा असतो तो म्हणज...
Image
"आठवण त्याची येत होती, सांगेल मी कांदा कापत होती...!!"   

ती....

Image
तिच्या सौंदर्याला थोडं मी ही जपतो म्हणतो,  अन् हळूच तिच्या गालावरील आनंद मी होऊ पाहतो, तिच्या केसाला सुगंधी फुलांचा गजरा ही माळतो, सोबतच तिच्या मनातील विचारांचा गंध अनुभवतो, लांब लांब केस तिचे तसेच गोड बोलनेही मनापासून ऐकतो, बोलण्यातील एक एका शब्दांत तिचे ते प्रेम मी निरखतो, तनाने तर बहू सुंदर आहे पण मनानेही तिचे ते सौंदर्य मी उजाळतो, -तुझाच सखा  Shree

Remote control.....आपल्या आयुष्याचं

Image
काय राजेहो काहींचं बोलणं ऐकून वाटतं कि हे माणसं आहेत कि जनावरं, चुक स्वत: करून बसत्यात अन् दुसर्याला म्हणत्यात कि तुझ्यामुळे माझं मुड खराब झालं...!! हो मान्य आहे की आपण माणूस आहोत त्यामुळे चुका ह्या होतीलच आणि होऊ शकते कि आपल्यामुळे कुणाचं कधी मन दुखावलं जाईल तर कधी मुड खराब होईल...पण अरे तु एवढा इतरांसाठी उपलब्ध कशाला झाला रे कि ज्याचा शेवटी तुलाच त्रास होईल...?? आणि हो चुक झालीच तर आहे ना त्यावर उपाय माफी मागण्याचा, समोरचा माफ करत असेल तर ठीकच ठीक नाही केलं तर त्याहूनही अधिक ठिक...पण महत्त्वाचं हे आहे कि चुक लक्षात आल्यावर त्याची माफी मागणं....पण कुठेतरी सेल्फ रिस्पेक्ट चाही भाग येतोच म्हणा, आपण माफी मागतोच मागत आहे पण समोरची व्यक्ती ते समजून घेण्यासाठी नावच नाही घेत असावी तर लांबूनच सलाम ठोकायचा मग..पण सेल्फ रिस्पेक्ट नाही हो गमवायची. पण व्यक्ती महत्त्वाची कि सेल्फ रिस्पेक्ट हे आपलं आपणंच ठरवायचं असतं हो....!! विषय हा होता कि कुण्या एका मुळे मुड खराब होण्याचा......!! तर त्या दिवशी काय झालंं...?? मी बोलताना सहज बोलून गेलो आणि माझ्या तिला खुप वाईट वाटलं, गोष्ट अगदी सोप्या ...

आई आणि मी..... जेव्हा मी चुक केलेली...!!

Image
*कधी काही चांगले केले तर आपल्या चांगल्या गुणांची वाह वा...!! करण्यासाठीची ती प्रेमाची शाबासकी अन् कुठे काही चुकले तर आईच्या हातचा तो रागाच्या भरातला मारही प्रत्येकानेच खाल्लेला असावा...हा अविस्मरणीय अनुभव तुम्हा सर्वांनी निश्र्चितच घेतला असावा...!! मग त्यानंतर ते थोडा वेळ आईचं आपल्याशी न बोलणंही अनुभवलंच असावं ..नाही का...?? आणि मग आपलं तिला मनवण्याचा तो कार्यक्रम ही केलाच असावा म्हणा,ती आपल्याशी बोलावं यासाठी. मग आपणही तिला आपल्या गोड शब्दांत सांगतो ....आई....आई ....आई गं...!! ऐक ना..मी ही चुक पुन्हा नाही हं करणार. मला माफ कर गं..आई हे सर्व मुकाट्याने ऐकत असते पण दाखवते, कि ती दुर्लक्ष करतेय आपल्या बोलण्यावर. मग आपला हा स्वार्थी पण जगावेगळा कार्यक्रम आटोपल्यानंतर...काही वेळानंतरचं तिचं ते कडूगोड शब्दांतलं बोलणं चालू होतं...मला माहीतेय कि माझा बाळ ही चुक पुन्हा नाही करणार; पण बाळा हे बघ ते करणं चुकीचंय, त्यामुळे तुलाच उगाच त्रास होईल रे बाळा.. म्हणून हे बघ आता असली चुक नाही करायची रे...तु शहाणा आहेस...आहेस न माझ्या सोन्या...!! मग त्यातून एक धाडस मिळते कि, ही चुक नाही करायची...

आई आणि मी..... जेव्हा मी चुक केलेली...!!

Image
*कधी काही चांगले केले तर आपल्या चांगल्या गुणांची वाह वा...!! करण्यासाठीची ती प्रेमाची शाबासकी अन् कुठे काही चुकले तर आईच्या हातचा तो रागाच्या भरातला मारही प्रत्येकानेच खाल्लेला असावा...हा अविस्मरणीय अनुभव तुम्हा सर्वांनी निश्र्चितच घेतला असावा...!! मग त्यानंतर ते थोडा वेळ आईचं आपल्याशी न बोलणंही अनुभवलंच असावं ..नाही का...?? आणि मग आपलं तिला मनवण्याचा तो कार्यक्रम ही केलाच असावा म्हणा,ती आपल्याशी बोलावं यासाठी. मग आपणही तिला आपल्या गोड शब्दांत सांगतो ....आई....आई ....आई गं...!! ऐक ना..मी ही चुक पुन्हा नाही हं करणार. मला माफ कर गं..आई हे सर्व मुकाट्याने ऐकत असते पण दाखवते, कि ती दुर्लक्ष करतेय आपल्या बोलण्यावर. मग आपला हा स्वार्थी पण जगावेगळा कार्यक्रम आटोपल्यानंतर...काही वेळानंतरचं तिचं ते कडूगोड शब्दांतलं बोलणं चालू होतं...मला माहीतेय कि माझा बाळ ही चुक पुन्हा नाही करणार; पण बाळा हे बघ ते करणं चुकीचंय, त्यामुळे तुलाच उगाच त्रास होईल रे बाळा.. म्हणून हे बघ आता असली चुक नाही करायची रे...तु शहाणा आहेस...आहेस न माझ्या सोन्या...!! मग त्यातून एक धाडस मिळते कि, ही चुक नाही करायची...