*कधी काही चांगले केले तर आपल्या चांगल्या गुणांची वाह वा...!! करण्यासाठीची ती प्रेमाची शाबासकी अन् कुठे काही चुकले तर आईच्या हातचा तो रागाच्या भरातला मारही प्रत्येकानेच खाल्लेला असावा...हा अविस्मरणीय अनुभव तुम्हा सर्वांनी निश्र्चितच घेतला असावा...!! मग त्यानंतर ते थोडा वेळ आईचं आपल्याशी न बोलणंही अनुभवलंच असावं ..नाही का...?? आणि मग आपलं तिला मनवण्याचा तो कार्यक्रम ही केलाच असावा म्हणा,ती आपल्याशी बोलावं यासाठी. मग आपणही तिला आपल्या गोड शब्दांत सांगतो ....आई....आई ....आई गं...!! ऐक ना..मी ही चुक पुन्हा नाही हं करणार. मला माफ कर गं..आई हे सर्व मुकाट्याने ऐकत असते पण दाखवते, कि ती दुर्लक्ष करतेय आपल्या बोलण्यावर. मग आपला हा स्वार्थी पण जगावेगळा कार्यक्रम आटोपल्यानंतर...काही वेळानंतरचं तिचं ते कडूगोड शब्दांतलं बोलणं चालू होतं...मला माहीतेय कि माझा बाळ ही चुक पुन्हा नाही करणार; पण बाळा हे बघ ते करणं चुकीचंय, त्यामुळे तुलाच उगाच त्रास होईल रे बाळा.. म्हणून हे बघ आता असली चुक नाही करायची रे...तु शहाणा आहेस...आहेस न माझ्या सोन्या...!! मग त्यातून एक धाडस मिळते कि, ही चुक नाही करायचीय पुन्हा...पण त्याहीपेक्षा आईने दिलेल्या त्या विश्वासाला नाही तोडायचंय ही एक आत्मीयता ही फार काही शिकवून जाते..आणि एक आदर्श डोळ्यांसमोर उभे राहते...!!
जास्त काही नाही पण चुक केल्यानंतर ते आपल्याला समजून घ्यावं हे अनेकांना वाटत असतं अन् त्याहीपेक्षा तो एक विश्र्वास...कि नाही "ही चुक तू पुन्हा नाही करणार " ही खात्री आहे हे सांगणारं असावं कुणीतरी ते ही हक्काचं.....!!!!
Comments
Post a Comment