एक नातं....



नातं ना हे फार खोडकरपणा ने निभावलं जावं, ते नातं प्रेमाचं असो वा मैत्रीचं, ते नातं असो रक्ताचं किंवा मानलेलं...पण ते तेव्हा च अधिक बहरते जेव्हा त्याला समजूतदारपणा ची कधी ऊब तर कधी सावली लाभते. ते नातं तेव्हाच अधिक फुलते जेव्हा त्याला कधी मायेची तर कधी रागाची काळी कसदार जमीन मिळते त्याला आणखीनच उभारी येण्यासाठी. कारण हे नातं प्रत्येकालाच नसतं मिळत हो, ते कधी मन हलकं व्हावं यासाठी तर कधी आनंदाचा उत्सव साजरा करण्यासाठी प्रत्येकालाच नसतो हो मिळत तो आपल्याच जिवलगाचा कधी डोकं ठेवण्यासाठी खांदा अन् मांडी...!! म्हणून म्हणतो जिवापाड जपावं त्या आपल्यातील आपल्या व्यक्तींना. कारण माणूस एवढाही भावनाहीन प्राणी नाहीये हो कि जो दु:ख पचवू शकेन. हो मान्य आहे कि काही हे दु:ख पचविण्यात खुप माहीर असतात पण काही काळ उलटुन जातो अन् ते पचवणं अतोनात कठीण होऊन बसतं.

Comments

Popular posts from this blog

वाट पाहताना..........!

गणित आयुष्याचं........