गणित आयुष्याचं........










इतक्या मोठ्या आयुष्याचं
साधं गणित आहे,
सुख-दु:ख, यश-अपयश 
यांची वजाबाकी करणेची आहे,

जे पुढ्यात येईल त्यातून
अनुभव घेत पुढे 
जाणेच आहे,
धगधगत्या वास्तवात 
स्वतःचं अस्तित्व जपणेची आहे,

ना भीती वादळांची
ना धास्ती संकटांची
तू उर्मी ठेव ना तुझ्यात
त्यांच्याशी लढण्याची,
तुझ्यासाठी कटकारस्थाने ही रचली 
जातील अनेक पण त्यातूनही
वाट तुला काढणेची आहे,

अंधारातूनही मार्ग काढण्याची
शक्ती तुझ्यात आहे,
तु चालत राहा, नियतीला ही 
तुझ्या मेहनतीपुढे झुकणेची आहे..!!





_भाउ काळे


Comments

Popular posts from this blog

एक नातं....

वाट पाहताना..........!