वाट पाहताना..........!
"वाट पाहणे" ही खरंतर सुखाची गोष्ट नाही. यामधून अनेक गोष्टी शिकायला मिळतात. ज्या गोष्टी बद्दल वाट पाहत आहे, त्यांचे महत्त्व कळायला लागते. त्यां विषयी आपुलकी निर्माण होते, थोडी भीतीही वाटते; परंतु जीवनापयोगी या वाट पाहण्यातून अनेक अनुभव देखील येतात. त्या गोष्टी बद्दल गोडी निर्माण होते.
आपण बघतो ते आगळं- वेगळं तेज पंढरपूरला जाणार्या विठ्ठल भक्तांच्या डोळ्यांत बघायला मिळते, ती एक आतुरता असते विठ्ठल दर्शनाची. त्यासाठीच त्यांची धडपड चालू असते. तेव्हा नक्कीच त्यांच्या मनात फक्त आणि फक्त जाणवायला लागलेली असावी ती ओढ. एकच ध्यास ते म्हणजे 'विठ्ठल दर्शन.' कुठल्याही गोष्टीत वाट पाहणे आलं कि, त्याबद्दलची गोडीही आलीच समजा. त्याचप्रमाणे "शेतकरी" इथे शेतकर्याची देखील तिच स्थिती आहे. मृग नक्षत्र लागलं कि, यांचं आकाशाकडे पावसाची वाट बघणं चालू होऊन जाते. तेव्हा त्याच्या मनात असलेली ही भीती त्या शेतकरी राजाला पोखरून काढते, ते म्हणजे या वर्षी पाऊस कसा असेल, या वर्षी पिक तर भरपूर होईल ना ! निसर्ग साथ देईल किंवा नाही? असे विविध प्रश्न त्याच्या मनात घर करतात.
कुठल्याही गोष्टीसाठी वाट बघायला लागली, तर त्याबद्दल जिव्हाळा निर्माण होतो, त्या विषयी प्रेम निर्माण होते. हळूहळू त्या विषयीचे महत्त्व लयास येते. कदाचित हा अनुभव प्रत्येकालाच आला असेल. प्रत्येकाच्याच विद्यार्थी जीवनात घडत असलेला किंवा घडलेला हा अनमोल प्रसंग! बर्याचदा परीक्षेचं वाट पाहणं असते, त्यामध्येही परीक्षेतील पहिला पेपर, पहिला पेपर झाला रे झाला कि, एक ते वाट पाहणं असते ते म्हणजे शेवटचा पेपर. परीक्षा संपली की ओढ असते ती रिझल्टची. असं हे वाट पाहणं.
👍🏻
ReplyDeleteNice...👍🏻
ReplyDelete👌
ReplyDelete👍👍👍👍
ReplyDelete