एकदा राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत Participate केलं होतं, मी तेव्हा नववीत होते. ती स्पर्धा ही खुल्या वयोगटातील होती, "माझी कन्या भाग्यश्री" या योजनेअंतर्गत राबवल्या गेली होती. एक मुलगी म्हणून मुलींच्या जीवनात येणार्या अनेक समस्यांची मांडणी निबंधात केली होती, पण तरीही तेवढं पुरेसं नव्हतं, त्याला हवे असलेले शब्द नियमांच्या अटीत कदाचित बसले नसावे, विचारांना थोडी फार speed होती पण हाताला नव्हती. त्यामुळे अपयश आले आणि बक्षीसही मिळालं नाही. त्यानंतर परत आल्यावर आमच्या मुख्याध्यापिका मॅडम नी विचारलं, मॅडम फक्त एक गुरू म्हणूनच नव्हे तर एक मैत्रीण म्हणून पण लाभलेल्या होत्या, कारण जीवन जगताना आलेल्या प्रश्नांना अचूक उत्तर अन् उपायही त्या मला वेळोवेळी योग्य मार्गदर्शनसह देत होत्या,मॅडमनी मला मग विचारल़, का गं स्पर्धा कशी झाली...?? आणि एवढी उदास का आहेस, मग माझं त्यावरचं उत्तर.... मॅडम मला बक्षीस नाही हो मिळालं. तिथे माझ्याहीपेक्षा वयाने आणि विचारांनीही मोठी अशी स्पर्धक होती. आणि हो मॅडम मी तिथे कमी पडली. मॅडम मला शांतपणे समजावून सांगत होत्या आणि मी ही ते सर्व मन लावून ऐकत होते, हे बघ बाळा तु एका स्पर्धेच्या युगात जगतेय तर तुला आधी स्वत:शी तर स्पर्धा करावीच लागेल पण आपले स्पर्धक किती सक्षम आहेत आणि आपल्याला आपल्यात अजून किती बदल घडवायचे आहेत हे महत्वाचं असतं भाग्यश्री आणि हो तुला स्पर्धेत बक्षीस का नाही मिळालं .....?? यासाठी तुला स्पर्धकांना दोष न देता तु कुठे कमी पडले हे वारंवार तपासत स्वत:ला या स्पर्धेत टिकवण्यासाठी भरभक्कम बनव आणि विचारांनी ही बळकट बनव. हे बघ तुझं एक वाक्य मला आवडलं, कि "तु म्हणालीस तु स्वत: कुठेतरी कमी पडली" यासाठी अजून मेहनत कर बाळा. आणि हे म्हणत पाठीवरून प्रेमाचा हात फिरवत शाबासकी दिली, जे माझ्यासाठी अनमोल असं होतं.
बस तेव्हापासून ठरवलं कुठे कमी पडलो, अपयश आले तर आधी स्वत:ला तपासत आपण युद्ध जिंकलोय कि हारलो, अन् स्वत:शी झालेली लढाई जिंकलो कि नाही हे आधी तपासावं, जेणेकरून पश्चात्ताप होणार नाही कधी...!!
*-(#BK)*
Comments
Post a Comment