रात्र चांदणी त्यात मी अन् ती ❤️......!!
अन् विचार करत होतो, कदाचित तु सोबत असतेस तर तुला ही चांदण्यांची रात्रच अख्खी बहाल केली असती बघ....!!
निळ्या निळ्या या आकाशात चमकणार्या तार्यांचा हा प्रकाश अन् सोबतीला चंद्र हाच तो काय पसारा,
पण माझ्या या आयुष्याच्या वाटेवर माझा पसारा सांभाळत थोडं मला समजण्याचाही विचार केला असता तर मी तुला माझं सर्वस्व बहाल करीन बघ.....!!
अमावस्या अन् पोर्णिमा यात जसा ताळमेळ तसाच माझ्या जीवनातील सुख-दु:खाला पचविण्याच्याची तु ती ताकद,
या चांदण्या राती कधी दु:खाने भिजलेला मी अन् तु तेव्हाच्या सुख नामक वार्याची ती झुळुक, अन् या रातीतील मी राग तर तु त्यातील सुर झलीस तर आयुष्याचा परीस मी होईल बघ.....!!
-भाग्यश्री उमेश काळे
Comments
Post a Comment