हक्क .....


⚜️कधी कधी वाटतं कि यार विनाकारण आपण कुणावर हक्क दाखवतोय, हे आपण तेव्हाच करत असतो जेव्हा थोडंफार वाटते आणि दिसते ही कदाचित समोरची व्यक्ती आपल्यावर हक्क दाखवतेय आपल्या चांगल्यासाठी. मग ती ही आपल्या हक्काची व्यक्ती समजून हक्क दाखवण्याचा अगदी थोड्या प्रमाणात जरी तो दाखवण्याचा प्रयत्न केला तर ती समोरची व्यक्ती दुखावली जाते कधी कधी. मग तेव्हा अचानक लहानपणी जसं खुर्चीवर बसल्यावर मागून फटके दिल्यावर जसा झटका लागतो ना अगदी तशीच चमक पडते, हे काय वेडेपणा करतेय तु..?? सर्वांत हक्काची व्यक्ती जर कुणी असेल ना तर ते आपण स्वत:च आहोत. कितीही स्वत: ला रागवा, कितीही चिडा, कितीही रडा आणि कितीही खळखळून हसा, स्वत:च स्वत:च भलंमोठं Platform बना, जे आपल्याला आतून कणखर अन् बलशाली बनवेल. ⚜️

-भा.उ. काळे

Comments

Popular posts from this blog

एक नातं....

वाट पाहताना..........!

गणित आयुष्याचं........