काही नव्हतं तरीही ती खुश होती,
पण मेहनत करण्याची तिची धमक मात्र जबरदस्त होती, अशी माझी दुसरी माय माझी आजी होती....!!

आज जरी ती आमच्यात नसली तरी ती विचाराने नेहमीच सोबत आहे. तीने दिल्येला शिकवणीचे बीज मनात पेरले गेलेले आहेत,जे एक सर्वांगीण मुलगी बनण्यासोबतच एक आदर्श मला बनवेल, ही खात्रीय. जरी ती खुप श्रीमंत नव्हती पण मनाने भरभरून देणारी होती. तुझ्याकडे येतेय म्हटलं कि, तिचं ते वाट पाहनं हे खुप कम्मालीचं म्हणजे....!! आली का...?? आली का ....?? म्हणत आजोबांना मला फोन करण्याचा तो तिचा हट्ट म्हणजे तर नादचखुळा...!! आणि त्यातही मी मोठी म्हणून माझ्यात तिचा कायमच खुप जीव होता. म्हणुनच कि, काय...?? मलाही तिथं जाणं फार आवडायचं. 

उन्हाळा लागला रे लागला कि माझा मुक्काम हा ईथेच म्हणजे माझ्या मामांकडे ठरलेलाच असायचा. खरं म्हणजे बरेचजण "माझ्या मामाच्या गावाला चाललोय" असं उत्तर असायचं; पण मला जर कुणी, कि का गं....?? उन्हाळ्याच्या सुट्टीत कुठे जाणार आहे....?? तर माझं ठरलेलं उत्तर असायचं...ते म्हणजे, "मी आजी-आजोबा कडे जाणार आहे. त्यामुळे माझी आणि आज्जीची थोडी जास्तच जवळीक वाढली होती, तिच्या इतर नातवंडापेक्षा म्हणजेच माझी भावंडे अन् मावशींची मुले. 

Comments

Popular posts from this blog

एक नातं....

वाट पाहताना..........!

गणित आयुष्याचं........