प्रेमाचं भांडण..
*ते कधी मधी केलेलं प्रेमाचं भांडण..........!*
*खरं म्हणजे त्या आपल्या प्रेमळ व्यक्तीसोबत केलेलं भांडण ना हे लयभारी असतं राव. कारण कसंय ना....?? त्या आपल्यातील आपल्या व्यक्तींशिवाय आपल्याला कुणी नाही हो सांभाळून घेऊ शकत. कारण आपला सगळा राग झेलून घेण्याची भलीमोठी जादू त्यांच्यामध्ये असते बरं का....?? अन् त्यातून जो आनंद मिळतो तो तर जगावेगळा असतो.*
*प्रत्येकालाच वाटत असतं कि आपल्या आयुष्यात कुणीतरी असं यावं जे आपल्याला खूप खूप जपेल, आपल्यावर अतोनात प्रेम करेल ज्यात कुठलाही स्वार्थ नसेल, आपल्या सोबतच आपल्या मनालाही अन् मनाच्या आनंदालाही फार फार जपत काळजाचा एक तुकडा आहे नव्हे नव्हे तर काळीजच तु आहे असं म्हणत कायम हातात हात धरून कधी प्रत्यक्षपणे तर कधी अप्रत्यक्षपणे कायमच पाठीराखा राहील. काही असो मना शेवटी "लक" हा फैक्टर ही अति इंपॉर्टेंट वाटतो मग मलाही कधी कधी. पण काही असो आपण जर स्वच्छ अन् नितळ मनाने जर चालत गेलो तर एक ना एक दिवस ती व्यक्ती मिळाल्याबिगर राहत नाही.*
*अरे हे सांगता सांगता मुळ मुद्दा विसरलीच राजे हो मी.....!! प्रश्र्न हा आपल्या व्यक्तींसोबत प्रेमाच्या भांडणाचा होता नाही का.....?? तर कधी कधी आयुष्यात त्या व्यक्तीसोबत रुसवे फुगवे ही आयुष्य रसगंधमय करण्यास भाग बणतात एक जीवनाचा. पण खरं म्हणजे ती व्यक्ती ही आपली असावी जी तिच्याही ह्रदयात आपलं नावं प्रेमाच्या शायीने गोंदणारी. मग ती रूसली कि आपला वेडा कारभार चालू होतो म्हणजे....!! पण ती तर आपल्याही पेक्षा अति भारी असते ती तर मानायलाच तयार नसते. अन् ती जर मुलगी असेल तर मग बस रे बस. गाल तर रागाने एवढे लाल होतात तिचे जशी कि गालाला लाली लावलीय, अन् ते लालच नाही तर फुगतेही ते असं वाटते कि तिने त्यात संत्री गोळ्या टाकल्याय कि काय ....?? त्या संपतील म्हणून. पण असो, आपला सगळा वेडा कारभार ती बघत असते अन् मनातल्या मनात तर ती आपल्याला वेड्यातही काढत असेल...कुणास ठाऊक..?? पण तिला मनवण्यात जे potential लागतं ना, हे राम....!! कधी अंगातून एवढा गेला नसेल, अंग भिजून जातं कधीमधी अन् बर्याचदाही अंघोळ करायची पण गरज नसतं. असो हा झाला थोडा गमतीचा भाग.*
*कधी कधी भांडण ही करावं म्हणा, पण तिला कधी दुखावलं जायला नको कधी. कारण शेवटी महत्वाचं हे असतं कि तिचं मन जपायला हवं. मग शेवटी तिला गोड मिठी मारुन जवळ घ्यावं अन् तिच्या त्या मांडीवर स्वत:चं डोकं ठेवून तिला पुन्हा समजावून ते असतं ना.....♥️ म्हणायचं तर ते ही न कचरता म्हणूनच टाकायचं थोडं तिलाही भारी वाटेल. तिच्याही मनाला थोडा और आनंद मिळेल. मग बाकी काय हेच तर हवं असतं, एकमेकांना साथ देत एकमेकांच्या सुख दुःखात साथ देणं, एकमेकांच्या मनाला जपत एक गोड हास्य सदाकाळ अन् सदाबहार ठेवनं.........!!*
- भा.उ. काळे
Comments
Post a Comment