सहवास.....!!
सहवास हा खूप गमतीदार आहे हो....नाही का....?? पण प्रत्येकाकडेच हा सहवास प्रेमाचा, सहवास मैत्री प्रेमाचा, असेलच असे नाही मग तो किंवा ती कुढत असते बिचारे ते, कुणाचा तरी प्रेमाचा सहवास मिळेल पण ....पण .....!! मिळेल की नाही या संभ्रमात आयुष्याची काही वर्षं निघून जातात परंतु जगातील सर्वात सुंदर व्यक्तीचा सहवास आपल्याला कायमच असतो हे कुणाच्या तरी सहवासाच्या शोधात मात्र विसरून जातो. म्हणूनच म्हणतो कोणाच्या दुसऱ्याच्या सहवासात राहायच्या आधी स्वतः आनंदाने हसत मुखाने अनुभव घ्यावा म्हणतो जगातील सर्वात प्रेमळ व्यक्तीशी सहवास लाभल्यासारखे वाटेल आणि जगण्याचा आनंद लुटता येईल भरभरून.
जरुरी नाही की प्रत्येकाकडेच मन रितं करण्यासाठी आपल्या हक्काचं घर किंवा आपल्या हक्काची जागा असेलच म्हणून कुणाच्या तरी मनात. कुणाच्या तरी ओठी आपल्यासाठी प्रेमाचे दोन गोड बोल असेल याची काहीच खात्री पटवून देता येत नाही. जास्त काही नाही तर चेहऱ्यावर एक गोड स्माईल मात्र नक्की ठेवावी इतरांसाठी हे जाणून घेऊन कि, आपल्याला प्रत्येकाला आनंदी ठेवण्याचा भलंमोठं काम नाही जमणार आहे म्हणून....!!
नसतं हो कुणाकडे, कुणीतरी आपली सुखदुःखे सांगण्यासाठी हक्काची व्यक्ती. बऱ्याचदा काय बोलावे हे ठरवलेले असते ; पण हव्या त्यावेळी हवी हक्काची व्यक्ती समोर नसल्यामुळे ते बोलणं तसंच राहून जातं आणि मग सवय पडून जाते आणि एक वेगळीच ताकद निर्माण होते ........!! स्वतःचे दुःख पचविण्याची ताकद निर्माण होते आणि एक वेगळाच आनंद येतो त्यात.
-भाग्यश्री उमेश काळे
Comments
Post a Comment