माझी बहीणाबाई
*माझी बहीणाबाई.....!!*
*जेवढे कठोर तिचे बोलणे पण मनातून अगदी सौम्य अन् भावना समजून घेणारी, अगदी मस्तीखोर अन् भांडण म्हटलं कि त्यात पहिलाच नंबर ते फक्त आम्हा दोघांसोबत(मी अन् माझा भाऊ) आणि आजीशी तर नेहमीचीच लढाई चालू असते, त्यामुळे कधी मधी वाटते कि भारत-पाक च युद्धच चाललंय जणू. कारण जास्त मोठ्ठ नसतंच पण तरीही भांडण करण्यात पटाईत. माझ्या घरातील एकमेव कार्टून अन् माझ्यासाठी जणूकाही डोरेमॉन. कारण प्रत्येक गोष्टीवरनं हासून देणारी ती पण बर्याचदा वाटते कि तीच माझी मोठी बहीण आहे. हसून हसून पुरेवाट घायाळ करणारीच ती पण जीवन जगण्याची रीत मात्र न्यारीच, अनेकदा बोलताना सहज बोलून जाते अन् त्यातून हसायलाही भाग पाडते पण एक मेसेज मात्र कुठला ना कुठला नक्कीच देऊन जाते. माझ्या घरची ती जणू कॉमेडीची बुलेट ट्रेन च आहे, त्यातून कधी मधी राग ही ती आणून देते, एकदा असंच माझं नि तिचं भांडण झालं आणि एक धपाटा तिला द्यायला गेली तर काय ...?? तिनेच हास्यस्फोट करून मलाच खाली पाडलं...!! असो हा झाला गमतीचा भाग...!! एक मुलगी म्हणून जगताना मला अनेक गोष्टी तिच्याकडनं शिकायला मिळाल्यात.बर्याचदा ती तिच्या बॅगमध्ये चटणीची डबी ठेवत असे, जास्त काही नाही पण एक सुरक्षेसाठी ती असावी.एकदा तीचा फोन मला आला असंच थोडी तब्येतीची विचारपूस केली, मग त्यानंतर बोलली, दिदी...!! एक सांगू का गं..?? मी म्हटलं सांग हो, "हे बघ दिदी, हा जमाना भल्यांचा नाही राहीलात, ज्या व्यक्ती आपल्या आहेत त्या सदैवच आपल्यावर प्रेम करत राहील अन् आपल्या पाठीशी ठामपणे उभ्या राहतील. पण कधीही अनोळखी व्यक्तीच्या चॉकलेटच्या आहारी नको हं जाऊ..जे मिळवायचं ते स्वत:च्या ताकदीने अन् स्वाभिमान बाळगत.....मग ते कुणाच्या घरची धुणीभांडी करा लागली तरी चालेल पण ते मिळालेले पैसे तुझ्या मेहनतीचे असेल." कळत नकळत अनेक तत्वे तिच्याकडनं शिकायला मिळतात. बोलते आणि तसं करूनही दाखवते, हा तिचा सगळ्यात भारी गुण. सुगरण म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. पाककलेतही जाम भारी, करते ही आणि खाऊ पण घालते. पण जिथली वस्तू तिथे दिसली नाही कि आमच्या मॅडम चा पारा लय गरम होतो..!*
Comments
Post a Comment