"प" पाळीचा.....
*"प" पाळीचा.....*
*कधी कधी तर राग येतो कि, यार आपण science शिकतोय पण तरीही याबद्दल हवी तेवढी जागरुकता नाहीएत. म्हणून वाटतं आता "प" पतंगीच्या ऐवजी "प" पाळीचा शिकवायला हवा. साधी गोष्ट पकडायची झाली ना, जेव्हा आम्ही विज्ञानात "menustral cycle" हा भाग शिकतो तेव्हा हा भाग सप्पा गाळलाच जातो, जर शिकवायला शिक्षक असलेत तर झालं रे झालं...मग ती diagram रट्टा मारता मारता दम निघून जातो पण exactly ती प्रोसेस कशी आहे हे अजूनही पुर्णपणे कळालेलं नाहीएत.....का...?? तर अजूनही तो एक गैरसमज म्हटला तरी वावगं ठरणार नाही. कारण ९,१०वी आणि आता १२ वीत आलेय पण आम्हाला ती प्रोसेस खुलके अजूनही सांगितली नाही. सर्वांना ही गोष्ट माहीती असूनही मग काहीच माहिती नाहीएत असं का केलं जातं असावं, त्याबद्दल अधिक जागरूकता का नाही आणावी...?? पाळी येणे ही स्त्रीयांच्या जीवनातील एक अति आवश्यक अशी प्रोसेस आहे. मग तरीही तिलाच याबद्दल बरीचशी माहिती नाही अजून, हीच मोठी शोकांतिका आहे. खरं म्हणजे चुक तिची नाहीएत हो अन् चुक त्याचीही नाहीए जो बर्राचदा उत्सुक असतो यासर्वांबद्दल जाणून घ्यायला, चुक तर आमच्या शिक्षणपद्धतीची आहे जिथे आम्हाला योग्य ते लैंगिक शिक्षणच दिलं जात नाही आणि पुस्तकामध्ये याबद्दल दिलंही आहे पण आम्हाला ते पूर्णपणे शिकवलंच जात नाहीए, मग केवळ रट्टा मारून नाही ना चालत कुठली गोष्ट, प्रश्र्न हा समजणे किंवा न समजणे यात अडकला असतो....!!*
-भाग्यश्री उमेश काळे
Right yaar👍🏻
ReplyDeleteThanks a lot
Delete