काय राजे हो.....!!





काय राजे हो.......!!

खरं म्हणजे आपण लहानपणापासनंच कुणाच्या ना कुणाच्या विचारांच्या पगडीखाली चिरडलो भरडलो जातो, कधी आई-बाबांच्या तर कधी नातेवाईकांच्या, वेळ आलीच तर शेजार्यापाजार्यांच्या.....आणि सर्वांत महत्वाचा पगडा जो असतो तो म्हणजे प्रथा- परंपरेचा.....!! कधी कधी अन् बर्याचदा मग वाटायला लागते कि यार आपण कुठेतरी चुकीच्या ठिकाणी तर जन्माला नाही ना आलोय....तर हळूच उत्तर येते 'ना____ही' चुकीच्या ठिकाणी नाही तर चुकीची माणसिकता असलेल्या ठिकाणी जन्माला आलोय आपण कि जिथे कधी स्वत:च्या विचारांनी जगायला पाप माणनारे लोकं आहेत. असो शेवटी ज्याचे त्याचे विचार......!

पण असं आपले विचार कुणावर लादणं योग्य नाही हो, जिथे अनेक मने तुटली जातात, जुळलेली अनेक प्रेमाची नाती अन् प्रेमसंबंध ही अर्धवट तयार होता होता राहून जाते, मनात तयार झालेलं एक सुंदरसं घर तयार झाल्यानंतर त्याला केवळ मोठ्यांच्या आशीर्वादाचा गिलावा जो असतो तोच मिळत नाही....!! पण शेवटी महत्त्वाचं हे आहे कि संसाराची गाडी योग्य चालावी यासाठी ती दोन चाके अतिमहत्त्वाची असतात, केवळ महत्त्वाचीच नसतात तर तिथे महत्त्वाचा असतो तो म्हणजे समजूतदारपणा, महत्वाचा असतो जिव्हाळा दोन मनामनांचा आणि आपुलकी. कारण ज्या व्यक्तीसोबत अख्ख आयुष्य काढायचंय ती व्यक्ती बाह्य सौंदर्याने किती सुंदर आहे हे गरजेचं नसतं हो, ते दोघंही मनाने किती सुंदर आहेत हे मनाला अधिक महत्त्वाचं असतं; कारण कसंय हो.....?? आज नाहीतर उद्या ते बाह्य सौंदर्य वयामानानुसार बदलणार, तो कितीही सुंदर असला किंवा ती कितीही सुंदर असली तरी म्हातारपणात चेहर्यावर सुरकुत्या आल्याबिगर राहणार नाय आणि हो राव अजून एक गोष्ट मुलगी लठ्ठ असो वा हाडकी हे ही महत्वाचंच नाहीए राजेहो, ते दोघंही खुश ना मग आई-बाबांनीही त्यांच्यापेक्षाही जास्त आनंदी असावं असं वाटते; पण नाही आमची मोठी मंडळी...बाबा रे बाबा, ऐकून घ्यायलाच तयार नाहीत हो, हीच एक मोठी शोकांतिका वाटते......!! मग हे सगळं असताना‌, आमची मोठी मंडळी का नाही समजून घेत हो.....??इथं तर तेही असंच करतात आमच्याशी, जसं त्यांना त्यांच्या आई- बाबांनी केलं होतं, अगदी तसंच त्यांना जी मुलगी योग्य वाटण मग घेलतं बाशिंग अन् बांधलं मुलाला आणि vice versa, अगदी मुलीसोबत ही तसंच होतं. म्हणजे आम्ही शिकलोय अन् मोठी झालोत पण विचारांनी मात्र तोच तो बुरसटपणा....!! कधी कधी तर लाज वाटते...कि कुठल्या समाजात जगत आहोत म्हणून...??? जिथे स्वत:च्या विचारांचा मोकळा श्वासही आम्हाला घेऊ दिला जात नाही, मग तर असंच झालं ना...आमच्या मोठ्यांना आमच्यावर तर विश्वास नाहीच आहे...No matter पण त्यांना त्यांनी आम्हाला दिलेल्या संस्कारांवरही विश्र्वास नाहीये....!!

मुलगी म्हणून जन्माला आल्याचा तिरस्कार वाटतो कधी, कि यार लहानपणी आई-बाबाच्या विचारांनी जगले, त्यानंतर कुठे थोडं समजायला लागलं आणि वाटलं थोडं स्वछंदीपणे जगावं पण तेही नशीबात नसतं असं मानावं लागेल. हळूहळू मोठी व्हायला लागते ती बिचारी तर वय वाढत जातं अन् घरच्यांचं अन् नातेवाईकांचं peer pressure येतं जे खुप भयंकर असतं, आपल्या pressure cooker पेक्षा तर जास्तच असतं....!! मग लग्नाच्या बेडीत तिला अडवायचं असतं ना त्यासाठीच हे सर्व. तिला मनवून घ्यायसाठी खुप खोटेनाटे कार्यक्रम चालतात राव आमच्या मोठ्यांचे, बरं हे केवळ मुलींच्या बाबतीतच नाही राजे हो तर मुलांच्या बाबतीतही होताना बघायला मिळते....मग मला भाय मोठ्ठा प्रश्र्न पडतो कि, साला ....या मुलाला त्या मुलीसोबत आयुष्य सांभाळयचंय कि या मोठ्यांना.....?? कळतंच नाही बर्याचदा...!! मुलगी अशीच आहे मुलगी तशीच आहे....लागलं यांचं गर्हाणं, अहो राव ती मुलगी आहे तिला जीव आहे, ती कुठल्या एका दुकानातली वस्तू नाहीये कि, जी कशीय हे तुम्ही ठरवाल.

एकदा माझ्या एका मैत्रिणीसोबत घडलेली ही घटना आहे... तिला एकदा एक मुलगा बघायला आलेला, मुलगा हा चांगल्या नोकरीवर होता, मुलगा कमावता होता... त्यामुळे मुलींकडचा होकार होता पुर्णपणे पण मुलांकडले थोडे होते न राजे हो शिकलेले अडाणी, असं म्हटलं तरीही वावगं ठरणार नाही त्यांच्यासाठी. या मुलालाही मुलगी बर्यापैकी आवडलेली, अन् मुलीलाही मुलगा पसंत होता. प्रश्र्न फक्त हा होता ...घरच्यांच्या "होकाराचा" ते 'हो' म्हणतील कि 'नाही' या विचाराने बिचारे दोघंही कोलमडल्या सारखे झालेले. हा प्रसंग बरेच दिवस चालला. काही दिवसांनी तो मुलगा या गोड मुलीला फेसबुक, इंस्टा यावर शोधू लागला. कारण आतापर्यंत गोष्ट ही एकमेकांना आवडण्याची होती, कारण पहील्या क्षणात त्याला ती आवडलेली आणि तिला तो...!! त्यानंतर मनं जुळनं महत्त्वाची होती. मग त्याचा शोध हा सफल झाला अन् त्याला अखेर ती इंस्टा वर मिळाली. मग हळूहळू बोलणं सुरु झालं, त्यांनंतर त्याने या मुलीला एक फोटो साठी मागणी घातली आणि हीने ही एक लाजत लाजत फोटो काढला अन् पाठवू कि नाय ...या विचारात असता असताच, त्याचा चेहरा डोळ्यासमोर ठेवून त्या काढलेल्या फोटोवरचं send हे ऑप्शन हळूच क्लिक केलं आणि पाठवून दिलं एकदाचं. मग तिकडनं त्याचा thanks चा मेसेज आला अन् मग हीनेही हळूच welcome dear चा reply ही दिला. बोलणं चालू होतं Insta वर, हळूहळू त्यांची मने जुळून आली, एकमेकांना समजून घेऊ लागलीत दोघेही. एकमेकांचे विचार पटू लागलीत,* *आवडीनिवडी ही बर्याच प्रमाणात सारख्या होत्या. हे सर्व असतानाही घरच्यांचा होकार नव्हता हाच मोठा प्रश्र्न होता. आणि दोघंही घरच्यांच्या विरोधात जायला तयार नव्हते. पण ईकडे या दोघांचं एकमेकांवरचं प्रेम अधिक घट्ट होत चाललं होतं आणि ते positive होते कि नाही आज ना उद्या घरचे होकार देतीलच. कारण काय...?? तर त्यांनाही त्यांची मुलं आनंदात बघायची असतात अन् तेच त्यांचं परमसुख- परमभाग्य असतं. त्यांची ती सकारात्मकता अन् एकमेकांवरील अतूट झालेला असा विश्र्वास त्यांना खंबीर बणवत होता. मग दोघेही ठरवतात आता घरच्यांना सांगायचं, त्यांची प्रेमानं थोडी समजूत घालायची अन् खरी परिस्थिती काय ..?? हे समजावून सांगायचं. मुलगी मुलाच्या घरच्यांशी बोलते अन् मुलगा मुलीच्या घरच्यांच्याशी‌. शेवटी त्यांचा हा program सफल होतो अन् आयुष्याच्या साथ फेर्यांत ही दोघेही बांधली जातात, बांधली जातात ती प्रेमाने ते ही अतूट अशा बंधनाने.......!!


-भा.उ. काळे

Comments

Popular posts from this blog

एक नातं....

वाट पाहताना..........!

गणित आयुष्याचं........