निळ्या आकाशाची चादर ओढून घेताना.......
ज्यात मी तुझा चंद्र अन् तु माझी सावली बनशील...!!
माझ्या शांत अन् नीरवपणात तु मला लाभली जणू तारकांसारखी,
मी तुझ्यात मला शोधेन अन् तु जमल़ तर मला शोधून बघशील....!!
मऊगार वातावरण हे अन् त्यात तु लाभली ऊबेसारखी,
चंद्राच्या छायेत नीजताना स्वत:त हरपून जाऊन प्रेमाचा तु मग वर्षाव करशील....!!
-भाग्यश्री उमेश काळे
Comments
Post a Comment