हृदयीचे शब्द......
दु:खाने त्रासून गेलेल्या व्यक्तींना आशेचा अनमोल किरण दाखवत, हास्याचे दर्शन करण्यासाठी असलेले छोटेखानी पण ह्रदयीचे दोन गोड शब्द फार मोलाचे ठरतात. जास्त काही अपेक्षा नसते हो तेव्हा जेव्हा खूप एकटं वाटत असेल,मन दु:खाने गच्च भरलेलं असेल पण हवी असते शब्दांची चाहूल अन् प्रेमाची गोड मिठी आपल्या व्यक्तींची आणि म्हणूनच असेल हो.... केव्हाही मन नाराज असेल, तेव्हा मनातून वाटतं की, आपल्या जवळची व्यक्ती सोबत बोलावं. असं असताना तेव्हा केवळ त्यांचा आवाज कानी पडला ना तरी ते आभाळाएवढं असतं.
म्हणूनच तर म्हटलं जातं भाषा व बोलणं हे असं असावं कि जे या हृदयीचे त्या हृदयी पोहोचेल. कदाचित हेच कारण असावं काही व्यक्तींच्या केवळ बोलण्यावर मन मोहून प्रेमात पडतात काही माणसे. खूप हळवी असतात ती मने जी शब्दांनी तुटली जातात पण त्याहूनही अधिक खास असतात ती मने जी शब्दांनी जोडली जातात म्हणून म्हणतो, शिकावं ते बोलणं जे हळव्या मनाला आपलंसं करेल, म्हणूनच म्हणतो शिकावी की बोलण्याची लतब जी दुखी मनाला ही दुःखातून चटकन बाहेर काढत आपलंसं करेन.
बऱ्याच जणांना बरेचदा प्रश्न पडतो की काहीजण एखाद्याचे कसे काय एवढ्या लवकर जिवलग बनतात......?? पण आतून आवाज येतो "अग सखे त्यांच्या प्रेमळ आणि रुचकर बोलण्यामुळे" म्हणूनच काहींना जास्त बोलणारी प्रेमळ व्यक्तींची सोबत हवी असते, त्या बोलण्यातही 'Law of Attraction' असतं हे पहिल्यांदा मला यावरनंंच कळालं. पण खरंय राव....!! बोलण्यामध्ये असावंच. कारण बर्याचदा काय होतं....?? समोरची व्यक्ती दु:खाने त्रासलेली असते पण ती घाबरते आपले दुःख व्यक्त करण्यासाठी अशा वेळी आपलं दोन शब्द त्यांच्याशी बोलणं त्यांना अर्ध्यापेक्षा जास्त दुःखातून बाहेर काढतं, त्यांचा तो प्रॉब्लेम सांगायच्या आधीच, म्हणजे बघा ना....!! या शब्दांत किती तरी शक्ती आहे जी अनेकांना प्रेरित करते. एक माणूस म्हणून जगण्यासाठी तेही केवळ दोन शब्द बोलून.
आणि म्हणूनच म्हटलं जात असावं माणूस हा न बोलता राहू शकत नाही. कारण त्या बोलण्यातूनच कितीतरी अडचणी पार करायला मदत होते, भावनांची, सुखदुःखांची मस्तपैकी आदान-प्रदान होते अन् देवाण- घेवाण होते इथे...!! "हृदयीचे शब्द" हे खरं तर एखाद्या अथांग सागराप्रमाणे आहे जणू, विविध गोष्टींचा अनुभव देत राहते; पण मात्र हे करत असताना कुठे काय बोलावं ...?? त्याचे भले मोठे ज्ञान असले पाहिजे माणसाला नाहीतर अनेक नातेबंध ही याच बोलण्यामुळे तुटलेले आपल्याला बघायला मिळतात.
शब्दांनी मन राखताही येतं ; पण त्याच शब्दाने मन जोडता येतो. या शब्दातून प्रेम ही व्यक्त करता येतं आणि रागही दाखवता येतो, कधी कधी याच रागातील शब्दामुळे माणूस सुधारून चांगल्या वळणी लागतो तर स्वाभिमान दुखावला गेला असेल तेव्हा कोणाचा जीवही घेतो. म्हणजे खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे "हृदयीचे शब्द" महिमा अपरंपारच आहे. फरक पडतो ते कडूगोड शब्दांत केवळ ...!! आणि इथेच खरा घोळ होतो. काही असतात ते गोड बोलून ही काटा काढतात म्हणजे इथेच खरी कसोटी लागते, कोण कसल्या अर्थाने आपल्याशी बोलतोय त्या बोलण्यामध्ये त्याचं काही स्वार्थ आहे काय .....?? काय हेतू आहे का त्याचे बोलणे मागे....?? कोण आपल्याशी निसंकोचपणे आणि निस्वार्थीपणे बोलतोय .......?? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे असली की खरा माणूस आणि त्याच्या "हृदयाचे शब्द" हे बरोबर कळायला लागते आणि जागृत होते ती एक अनमोल विचारसरणी.....!!
-भाग्यश्री उमेश काळे
Comments
Post a Comment