Remote control.....आपल्या आयुष्याचं
विषय हा होता कि कुण्या एका मुळे मुड खराब होण्याचा......!! तर त्या दिवशी काय झालंं...?? मी बोलताना सहज बोलून गेलो आणि माझ्या तिला खुप वाईट वाटलं, गोष्ट अगदी सोप्या भाषेत तिला समजावून सांगितली होती पण ती ऐकायलाच तयार नव्हती. मग ती काही वेळ बोललीच नाही.मला वाईट होतं कि, यार आपण तर हिला सहजच म्हटलं तर याचं तिला एवढं कसं काय वाईट वाटलं..?? मग मीच बोललो, का गं मला तु मित्र मानतेस ना तर मग माझ्या बोलण्याचं एवढं कशाला वाईट वाटून घेतलं हो...!! मग ती म्हणाली " प्रश्न हा नाही रे कि तु मला बोलला, प्रश्र्न तर हा आहे की तुझ्या मुळं माझा अख्खा दिवस वाया गेला, तु माझा पुर्ण मूडच ऑफ करून टाकला..." मी तर शॉकच झालो...!! आणि मग तिला प्रेमानं जवळ घेत समजावून सांगितलं...सखे हे बघ.......
कुणी आपल्याला काही ही बोललं ना तर त्याचा एवढा फरक नाही हं पडू द्यायचा आणि उगाच स्वत:ला त्रास नाही करून घ्यायचा...आणि हो जर ते बोलणं आपल्या अस्तित्वाला सुधरवण्यासाठी बोललं गेलं असेल तर ते एकून घेऊन स्वत:मध्ये जरुर बदल घडवायला नाही हं विसरायचं. सगळ्यात महत्त्वाचं स्वत:चं #remote control हेे नेहमीच स्वत:जवळच असायला हवं. ते कधीच इतर कुणाकडेे जायला नको.
Comments
Post a Comment