एकदा काय झालं....?? असंच आम्ही दोघे मस्तपैकी गप्पा मारत बसलो होतो...तेव्हा मी माझ्या राधेला सहज एक प्रश्र्न विचारला...."राधे....हे राधे....!! का गं मी तर एवढा सुंदर नाहीये पहायला शिवाय शरीरयष्टी पण तेवढी माहोल नाहीच ए मुळी, तरी तु माझ्यावर जिवापाड प्रेम करतेस...का असं...?? आजची परिस्थिती बघून विचारलेला हा प्रश्र्न.
त्यावर माझी राधा बोलली...अरे Krishna तुला माहीतेय ना...!! आज तु सुंदर दिसतोय, कदाचित उद्याही दिसशील ...पण काही काळानंतर तुझं सौंदर्य काय नि माझं काय ....हे जाणारच आहे नि त्यात तिळमात्र ही शंका नाही आहे.मग का म्हणून मी तुझ्या बाह्य सौंदर्यावर प्रेम करावं बरे...! आणि हो मी तुझ्या दिसण्यावर कधीच प्रेम केलेलं नाही रे पगलू, मी तर तुझ्या असण्यावर प्रेम केलंय, मी प्रेम केलंय ते तुझ्या गोड अन् प्रेमळ स्वभावावर, मी प्रेम केलंय ते तु माझ्यावर ठेवलेल्या विश्वासावर अन् प्रेम केलंय त्या तुझ्या वेडेपणावर, जो तु मला कायमच समजून घेतोस, आणि दोघांत काही भांडण झालंच तर मला दोष न देता...त्यामागचं कारण काय ह्या कलेवर ....!! हे बोलून एक स्मितहास्य देत तिने ती दिलेली ती एक गोड मिठी अन् तिचं ते बोलणं आजही मनाला साद घालतं....!!

_#BK

Comments

Popular posts from this blog

एक नातं....

वाट पाहताना..........!

गणित आयुष्याचं........