जीर्ण झालेल्या त्या VMV ची आत्मकथा....
कधीकाळी निसर्गाच्या सानिध्यात राहणारी मी आता तो सहवास शोधत असते, माझ्या छायेत तासनतास बसत गप्पा करणारे मित्रमंडळी नुसतेच बघत राहते, शिक्षक-विद्यार्थ्याचा निवांत संवाद आता फक्त आठवणीतच आठवत असते, उन्हाच्या कडाक्यात माझा आसरा हुडकणारे आता मला कमीच मिळतात, माझ्या रंगांच्या जुन्या पापुद्र्याचे थरच्या थरं आजकाल फक्त गळून पडतात, वय झालं आता सारंच झालं म्हणून कि काय माझी साथ देणारे ते डगडही एकेक करून साथ सोडतात, मला बांधते वेळी लावले गेलेले ते झाडेच आता मला माझी उरली दिसते, माझी जुनी इमारत सोडून सारं कसं नवं नवं वाटत मला परकं करत राहते, शिशिरा प्रमाणे सारं काही ओसाड झालेलं माझं आयुष्य वसंताच्या येण्याची वाट पाहत दिसते, एकेकाळी माझ्या आयुष्याच्या, सारे काही स्वच्छ अन् बेभान असायचे, स्वच्छंदी जगणारी मी ही प्रेमी युगलांच्या आणाभाका ऐकत राहायचे, सारं काही फक्त न्याहाळत स्वतःला मिठी मारत हजारदा स्वतःतच हरपून जायचे, _भाग्यश्री उमेश काळे