मितवा.....
सुखा दुःखात सोबतीने राहणारी,
यशापयशात मला खंबीर करणारी,
असावी ती..
आनंदात माझ्या सदाकाळ आनंद मानणारी,
दुःखात ही हसायला लावणारी,
असावी ती..
सोबतीने हातात हात घेऊन चालणारी,
वेळप्रसंगी पाठीमागे धीराने उभी असणारी,
असावी ती..
चुक केल्यास हक्काने ओरडणारी,
लगेच प्रेमाने समजावून सांगणारी,
असावी ती..
सतत चेहऱ्यावर हास्य ठेवणारी,
दुःखाला कधीच न घाबरणारी,
असावी ती..
ध्येयपूर्ती साठी सदाबहार धडपडणारी,
आईबाबांच्या कष्टाची जाणीव ही ठेवणारी,
असावी ती..!!
_भा.उ. काळे
Comments
Post a Comment