फुला.....
फुला तुझ्यासारखं फुलता यावं,
दुसऱ्याचा आनंद होता यावं,
फुला तुझ्यासारखं प्रेमळ मन मिळावं,
दुसऱ्यांवर प्रेम करावयास ही मिळावं,
फुला तुझ्यासारखं मनसोक्त झुलता यावं,
नि स्वछंदीपणे स्वातंत्र्याने फुलता ही यावं,
फुला तुझ्यासारखं निस्वार्थ हसावं,
स्वतःवर निस्सीम प्रेमही करणं व्हावं,
फुला तुझ्यासारखं वाऱ्याचा मित्र व्हावं,
"मैत्री" नावाचं नातं श्वासासोबत जगण्यास मिळावं....!!
_#BK
Comments
Post a Comment