प्रत्येकाचं जग वेगळं.....



प्रत्येकाचं जग वेगळं,
प्रत्येकाच्या संज्ञा वेगळ्या,
आणि वेगळ्या प्रत्येकाच्या परिभाषा...!!

प्रत्येकाचा मंच वेगळा,
प्रत्येकाची भुमिका वेगळी,
आणि वेगळ्या प्रत्येकाच्या आशा-निराशा...!!

प्रत्येकाचं मैदान वेगळं,
प्रत्येकाचा खेळ वेगळा,
आणि वेगळ्या प्रत्येकाच्या डावाच्या भाषा...!!


_भाग्यश्री उमेश काळे



Comments

Popular posts from this blog

एक नातं....

वाट पाहताना..........!

गणित आयुष्याचं........