ती आणि बरंच काही....

आवडती व्यक्ती सामोरी बसणं,
अन् तिच्याकडे बघून हळूच हसणं,

एकमेकींकडे बघण्याचा वेळ एक होणं,
मग त्या क्षणालाच सतत आठवत राहणं,

दोघीचं राहणीमान सारखं असणं,
सारखं असेलच का वागणं-बोलणं..??

एक ध्येयवेडी ती मैत्रीण/प्रेयसी म्हणून लाभणं,
होईल का हे सत्यात बघायला मिळणं..??

_भा.उ. काळे




Comments

Popular posts from this blog

एक नातं....

वाट पाहताना..........!

गणित आयुष्याचं........