स्व प्रेम....
काही गोष्टी बाजूला सारून, झालं गेलं सारं विसरून,
स्वतःला मधे ठेवून, आनंदाने स्वतःलाच मिठीत घेऊन,
आठवणींना थोडं मागे सोडून, स्वतःशीच मनसोक्त गप्पा मारून,
एकेक क्षणांचा आनंद मिळवून, आणि मग साऱ्या अनुभवांना जपता जपता आणि स्वतःला आनंदात ठेवता ठेवता मिळणारं समाधान हे फार भारी असतं....!!
_भा.उ. काळे
Comments
Post a Comment