मन हे वेडे.......

सगळं कळून न कळणारं हे मन,
सगळं समजून न समजणारं हे मन....!!
ह्या मनाची परिभाषा आणि हे मन फार कठीण समजून घेणं....!! समजायला कठीण, समजूनही न उमजणारं भलंमोठं कोडं आहे हे मन. पण याची कोडींग कळायला लागली कि खरा अर्थगर्भ कळायला लागतं. अगदी या हृदयीचे त्या हृदयी....!! कुठल्याही नात्यात हेच मन समजून घेणं अगदीच महत्वाचं. अगदीच महत्वाचं त्याला कळून घेणं आणि एकदा ते कळायला लागलं कि त्या नात्यात कधीच दुरावा येत नाही. न बोलता बरंच काही ओळखता येतं आणि शब्दाविना संवाद होत जातो दोन मनांचा. 

_भा.उ. काळे

Comments

Popular posts from this blog

एक नातं....

वाट पाहताना..........!

गणित आयुष्याचं........