सहजच.....💖
सहजच यावं कुणीतरी आयुष्यात आणि जगण्याचा अनोखा भाग बनून जावं,
तिच्याविना आयुष्य आयुष्यच न राहावं, पण जगणं मात्र न्यारं होत जावं,
आनंदाचा हळूच ती वाटा होत आनंदाचं कारणही तिचं असणं मग व्हावं,
सोबत हातात हात देऊन पाठीवर खंबीरतेचं पाठबळही मग तिच व्हावं,
ध्येयाची कास हाती देऊन एकेका ध्येयाला पार करण्यासाठी एकमेकांचं मार्गदर्शक बनावं,
यशापयशात आधार अन् चांगल्यासाठी एकमेकांची शाबासकी ही बनावं,
_भा.उ. काळे
Comments
Post a Comment