अगं पोरी.....थोडं ऐकशील का....????
*चेहर्यावर गोड असं स्मितहास्य अन् गालावर खळी असलेली तु.....सखे नेहमी आनंदी राहा...!! स्वत:शी संवाद घालत स्वत:ला आणखी खंबीर बनव हं, सोबतच स्वत:च्या धाडसासाठी एक मीठी मारण्यासही नको गं विसरू. मुलगी आहे म्हणून काय झालं...?? तुझं स्वातंत्र घट्ट करत थोडं फैशन च्याही आहारी जात थोडं make up ही कर म्हणतो मनाचं अन् तनाचंही....कसंय न काही मग त्यातही टोमणे मारायला मागं उरत नाही गं..कि हे काय वरून पाऊडर, फाऊंडेशन अन् लाली लावली कि सौंदर्य निखारलं म्हणत आतलं सौंदर्य काही औरच म्हणजे काळच आहे असंही म्हणतात. म्हणून मनाने निर्मळ, निरागस अन् तेवढीच खंबीर बन अगं पोरी....!!*