बापाच्या काळजाचा तुकडा असते मुलगी....बापाची दुसरी आई असते मुलगी.....!! म्हणून मुलीला साधी ठेच जरी लागली तरी बापाचे काय हाल असते, हे फक्त त्याच्या चेहऱ्यावरचे हावभावच आपल्याला सांगू शकतात.
नातं ना हे फार खोडकरपणा ने निभावलं जावं, ते नातं प्रेमाचं असो वा मैत्रीचं, ते नातं असो रक्ताचं किंवा मानलेलं...पण ते तेव्हा च अधिक बहरते जेव्हा त्याला समजूतदारपणा ची कधी ऊब तर कधी सावली लाभते. ते नातं तेव्हाच अधिक फुलते जेव्हा त्याला कधी मायेची तर कधी रागाची काळी कसदार जमीन मिळते त्याला आणखीनच उभारी येण्यासाठी. कारण हे नातं प्रत्येकालाच नसतं मिळत हो, ते कधी मन हलकं व्हावं यासाठी तर कधी आनंदाचा उत्सव साजरा करण्यासाठी प्रत्येकालाच नसतो हो मिळत तो आपल्याच जिवलगाचा कधी डोकं ठेवण्यासाठी खांदा अन् मांडी...!! म्हणून म्हणतो जिवापाड जपावं त्या आपल्यातील आपल्या व्यक्तींना. कारण माणूस एवढाही भावनाहीन प्राणी नाहीये हो कि जो दु:ख पचवू शकेन. हो मान्य आहे कि काही हे दु:ख पचविण्यात खुप माहीर असतात पण काही काळ उलटुन जातो अन् ते पचवणं अतोनात कठीण होऊन बसतं.
"वाट पाहणे" ही खरंतर सुखाची गोष्ट नाही. यामधून अनेक गोष्टी शिकायला मिळतात. ज्या गोष्टी बद्दल वाट पाहत आहे, त्यांचे महत्त्व कळायला लागते. त्यां विषयी आपुलकी निर्माण होते, थोडी भीतीही वाटते; परंतु जीवनापयोगी या वाट पाहण्यातून अनेक अनुभव देखील येतात. त्या गोष्टी बद्दल गोडी निर्माण होते. आपण बघतो ते आगळं- वेगळं तेज पंढरपूरला जाणार्या विठ्ठल भक्तांच्या डोळ्यांत बघायला मिळते, ती एक आतुरता असते विठ्ठल दर्शनाची. त्यासाठीच त्यांची धडपड चालू असते. तेव्हा नक्कीच त्यांच्या मनात फक्त आणि फक्त जाणवायला लागलेली असावी ती ओढ. एकच ध्यास ते म्हणजे 'विठ्ठल दर्शन.' कुठल्याही गोष्टीत वाट पाहणे आलं कि, त्याबद्दलची गोडीही आलीच समजा. त्याचप्रमाणे "शेतकरी" इथे शेतकर्याची देखील तिच स्थिती आहे. मृग नक्षत्र लागलं कि, यांचं आकाशाकडे पावसाची वाट बघणं चालू होऊन जाते. तेव्हा त्याच्या म...
इतक्या मोठ्या आयुष्याचं साधं गणित आहे, सुख-दु:ख, यश-अपयश यांची वजाबाकी करणेची आहे, जे पुढ्यात येईल त्यातून अनुभव घेत पुढे जाणेच आहे, धगधगत्या वास्तवात स्वतःचं अस्तित्व जपणेची आहे, ना भीती वादळांची ना धास्ती संकटांची तू उर्मी ठेव ना तुझ्यात त्यांच्याशी लढण्याची, तुझ्यासाठी कटकारस्थाने ही रचली जातील अनेक पण त्यातूनही वाट तुला काढणेची आहे, अंधारातूनही मार्ग काढण्याची शक्ती तुझ्यात आहे, तु चालत राहा, नियतीला ही तुझ्या मेहनतीपुढे झुकणेची आहे..!! _भाउ काळे
Comments
Post a Comment