चुकीला माफी सोबत शिक्षाही असावी.....!!
*LITERARY...........!! अगदी इथेच खरा घोळ होतो आणि अनेक नाती चिरडली भरडली जातात इथे अन् काही तर संपुष्टात ही येतात... म्हणूनच म्हणावंसं वाटतं काही problem झालाच तर आधी व्यक्तीला दोष देण्याआधी त्यामागचं कारण काय हे जाणून घेतलं ना तर अनेक अडचणींवर हसत हसत उपाय मिळतो. हो मान्य आहे कि, प्रत्येकाचा point of view हा वेगळाच असतो, पण त्याहूनही अधिक understanding महत्त्वाची असतेच असते प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक नात्यात....!! तरीही आपलीच व्यक्ती आपल्याला अगदी चांगल्या प्रकारे समजून सांगत असेल न तर ऐकून घ्यावं आणि आपण खरंच चुक केली असल्यास मान्य करून घेऊन ती पुन्हा होणार नाही यासाठी स्वत:चं आत्मपरीक्षण करता करता स्वत:ला बजावून सांगावं माणसाने, कि बाबा रे ....ही चुक आता केली पण पुन्हा करू नको रे, उगाच गैरसमज होतील रे.!! पण ती समोरची व्यक्तीही कठोर असावी म्हणा तिनेही थोडं समजावून सांगण्यासोबतच थोडा विश्वासही दाखवावा म्हणा.हो मला मान्य आहे कि तु चुकले पण हा ही विश्वास आहेच कि तु असली चुक पुन्हा करणार नाही म्हणून. कारण कसंय ना, ह्या सांगण्यात जी आपुलकी येते ना हो, तीच आपल्याला अधिक ठाम बनवत असते ती चुक न व्हावी यासाठी.!
म्हणून म्हणतो कि आयुष्यात अशा कडूगोड व्यक्ती लाभल्या असतील ना तर त्यांना जिवापाड जपण्याचा प्रयत्न करावा, जे सांगतीलही चुकले भाकले तर अन् आपल्याला अधिक चांगली व्यक्ती बनवण्याचा प्रयत्नही करतील ..... आयुष्य कारणी लागेल अन् अधिक रसगंधमय होत जाईल जगणं....!! कारण प्रत्येकालाच हा सहवास नसतो हो मिळत....!!
-भा.उ. काळे
Comments
Post a Comment