काही गोष्टी जिथल्या तिथंच सोडून देताना....
काही गोष्टी ह्या जिथल्या तिथंच सोडून दिलेल्याच बर्या असतात, उगाच वाद घालत कुणाचं मन दुखावल्या गेल्यापेक्षा, काही गोष्टींचा पुन्हा नाद केलेलाच बरा असतो. काही गोष्टी जास्त कान देऊन ऐकणंही घातचंच आहे बा. म्हणजे कधी काय होतं ...?? आपण एक म्हणतो तर समोरचा दोन लावतो...म्हणजे कसंय काहींच्या अगदी साध्या गोष्टी अगदी सोप्या पद्धतीनं जरी समजावून सांगितल्या तरी त्यांच्या पचनी पडत नाही ... म्हणून म्हणतो सोडून द्यावं काही,जे आपल्या उपयोगाचंच नसेल असं आणि जगावं थोडं मनमुरादपणे, जगावं थोडं स्वत:शीच तर कधी कधी आपल्या जिवलगांशी थोड्या खोड्या करत, जे आपल्या जगण्यासहीत थोड्या प्रमाणात त्यांचेही जीवन साध्य करेन एक हास्याची गोडी घेत, त्यांनाही आपण एक अनमोल जीवन जगत आहोत हा एक गोड भास झाल्यागत वाटेल.....!! म्हणून म्हणतो दुसर्यांना बदलून पाहायच्या आधी, दुसर्यातील चुका शोधल्यावर त्यावर चांगला उपाय काय....?? हे जर positive approach ठेवून बघितलं नं तर प्रत्येक गोष्टीवर आपल्याला उपाय दिसेल.
-शब्दरत्न
Comments
Post a Comment