जीने का दुसरा नाम हैं दोस्ती......!!!
असं म्हणण्यातही काही वेगळं नाही वाटत आता मैत्रीच्या बाबतीत...... "जीने का दुसरा नाम हैं दोस्ती.....!!" मित्र, तत्वज्ञ, वाटाड्या, यार, सखी..... अशा विविध नावांनी आपण एक व्यक्ती आपण आपल्या ह्रदयाच्या कप्प्यात बसवतो अन् तेही मैत्रीच्या नात्याने. यात gender हे मुळीच महत्वाचं नसते, महत्वाचं असते ते म्हणजे एकमेकांना खोलवर समजून घेणे, प्रत्येक सुखादु:खात सोबत जरी नसू पण मनाने तेवढंच मोठ्ठ पाठबळ देणे अन् महत्वाचं असतं ते हेही "एकमेकांवरचा विश्र्वास" कोणी कितीही राजा माणूस आला कि येवो पुढे एखादा बाप माणूस पण कुणाच्या एका सांगण्यावरून त्या विश्वासाला तडा जायला नको, पण मग आपल्यातही तेवढी हिम्मत मात्र नक्कीच असायला हवी तो विश्र्वास कायम राखण्याची.
मैत्री हा बंधच फार फार कठीण असतो, जोडायला तर तारेवरची कसरत लागते, पण एकदा जुळला तर जीवनाचा सोनं झाल्यावानी वाटते.....पण आजची जर परीस्थिती बघितली न राजेहो तर कुठे काही वेगळीच चाललीय. ज्यामुळे कधी कधी यावरुन विश्वास पण उठून कधी कधी भुर्र पळून जातो....!! पण हे तेव्हाच होतं जेव्हा हे अनमोल नातं केवळ स्वार्थासाठी निभावलं जातं. खरं म्हणजे या नात्यात शेवट हा कधीच नसतो.....!! शेवट असतो त्या मैत्रीच्या नात्यात जी मैत्री स्वार्थासाठी केली जाते, म्हणजे कसं... काम संपलं रे संपलं कि मैत्रीही संपलीच म्हणा मग तिथे....!!
पण मैत्रीप्रेम हे खरंच जगावेगळं असतं, दु:खाच्या काळात उन्हाच्या झावा लागत असताना एक मायेची वेगळीच उब त्यातून मिळत राहते निरंतर, अन् कठीण काळातही डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहताना ही असलेल्या problems वर solutions ची धीराची छत्री पकडायला तर कायमच तयार असते त्या गोड मैत्रीतील ती "प्रेमळ व्यक्ती." कुठे काही चुकले तर रागाच्या भरात एक जोरदार दणका द्ययला ही पुरुन उरते, पण काही चांगले केले नं तर सगळ्यात आधी आपले कौतुक इतरांना सांगण्यातही मागे राहत नाही आणि हे सर्व करत असतानाही पाठेवर एक प्रेमाची थाप देत "मी आहे ना .....!!" म्हणत एक उबदार अन् गोड मिठी घेण्यासही कधी विसरत नाही. अशी ही अनमोल मैत्री प्रत्येकालाच हवी असते. हवा असतो तो एक हात जो खंबीरपणे साथ देत आपल्याला आणखी धाडसी बनवणारा, हवी असते ती एक साथ जी आपल्याला अजून सकारात्मक घडवेल, हवं असतं ते कडूगोड बोलणं ज्यातून एक भीती तर राहीलच फक्त विश्वासाने राहण्याची पण एक प्रेरणा जी सतत मिळत राहील, ज्यातून ध्येयाच्या मार्गाने चालण्यास भक्कम ताकदही मिळेल आणि हवं असतं ते एक बोलणं जे आपल्यातील खुबी बाहेर काढून त्यात अजून परीपक्व करण्यास मदतही करेन......!!
आयुष्याच्या वाटेवर चालताना हजार व्यक्ती जरी भेटल्यात ना तरी ती एक खास अशी व्यक्तीच असते आपल्यासाठी ते म्हणजे "एक मैत्रीण किंवा एक मित्र" कारण ति जागा कुणीच नाही घेऊ शकत.....!!
कितीही दुःखी असू देत पण मैत्रीचं नातं तेव्हा पहिले आठवतं, जेव्हा खुप एकटं एकटं वाटतं तेव्हा ही ती एकच व्यक्ती आठवते आई-बाबा नंतर, कितीही छोटी गोष्ट असू देत पण तरीही तिला पहिल्यांदा सांगावीशी वाटते, अगदी लहानात लहान का असेना पण कधीकधी चांगलंच भांडण ही करावं वाटते तिच्यासोबत, पण त्यातून आलेल्या क्षणिक रागातून तिला मनवण्याचं भारी कामही मग आनंदाने करावं वाटतं तिच्यासोबत तिच्या आनंदासाठी जी मग दोघांचाही आनंद द्विगुणित करायला भाग पाडते.....!! ती एक मैत्रीच असते जिथे हा सर्व वेडा कारभार अतिशय सुंदर रितीने पार पाडला जातो.
कधी कधी विचार केला तर विचार करायलाही भाग पाडतात एवढे सारे प्रश्र्न मग एका पाठोपाठ उडी घेत, माझं उत्तर दे, माझं उत्तर आधी दे करत फार त्रासही देतात पण तरीही राव या मैत्री नावाच्या अनेक प्रश्नांची उत्तरे ही अनुत्तरित च राहतात. पण असो एक मैत्रीचा गंध काही औरच असतो, जो सांगता येत नाही केवळ अनुभवता येतो. कधी काळी एक लेख वाचला होता त्यात लिहिलं होतं कि मैत्री ही विविध रंगी अन् विविध प्रकारची कपडे घालावेत अन् त्यातून जो आनंद मिळतो हा जसा ज्याचा त्याला कळतो अगदी तसंच या मैत्रीचं आहे, ज्याच्याकडे हे आहे त्यालाच कळते ती मायेची नि प्रेमची उब बाकी केवळ विश्वासाचं नातं आहे जे विश्वासानेच आणखी फुलतं.... अन् विश्वासानेच ते सदाबहार बहरत असतं.....!!
हे दोन शब्द त्या मैत्रीप्रेमासाठी......!!
त्या मैत्रीतील अतूट विश्र्वासासाठी....!!
हे दोन शब्द त्या प्रेमळ शब्दासाठी जे थेट ह्रृदयाला भिडत राहो यासाठी.....!!
काही शब्द त्या मैत्रीच्या केवळ रागातील पण हक्काच्या बोलण्यासाठी जी नेहमीच राखीव असतात माझ्यासाठी.....!!
हे शब्द प्रेमाचे.... मैत्रीसाठी जे वाढवेल रोप मैत्रीचे विश्वासासाठी.....!!
हे दोन शब्द तिच्यासाठी अन् तिच्यातील अतुट अन् अतुलनीय अशा मैत्रीसाठी.....!!
खूप छान विचार आहे तुझे.. आणि ते तु आचारनात् पण खूप छान आणते. खूप काही शिकायला मिळत तुझ्या लिहन्यातुन् 👍🏻👍🏻👍🏻😊
ReplyDeleteधन्यवाद 💖😊
Delete