नट - बोल्ट






*नात्यांच्या प्रेमळ संरचनेमध्ये बांधल्या गेल्यावर कधी कधी नटाला पान्याने घट्ट करावं लागतं, जेव्हा तो खुप सैल झाला असेल अन् हाताबाहेर जाण्याची शक्यता असेल तेव्हा रागाच्या भरात त्याला जोरदार कसावं लागतं तर कधी थोडा जरी ढिल्ला झाला असेल तर हळूवार पणे कसनंच योग्य असतं. अगदी याच नट-बोल्टाप्रमाणे नात्याचंही असतं.... गोष्ट आवाक्यात असली तर प्रेमानं तर आवाक्याबाहेर गेल्यास दोन कानाखाली देऊनही ते ठिकाणावर आणता येती....!! पण बर्याचदा आपण चुक झाल्यास एकमेकांना दोष देत बसतो तर त्याऐवजी त्यामागचं कारण काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला न तर निश्र्चितच तो प्रश्न सुटून आपण पुन्हा योग्य वळणावर लागतो. कारण कसंय माहीतेय का.....?? कधी कधी नट फिट्ट करायच्या नादात तो प्रमाणापेक्षा अधिक घट्ट झाल्याने त्याच्या आट्याच खराब होऊन जाते, अगदी हेच ध्यानात घेऊन चाललं ना तर बर्याच नात्यात तडा जाण्याआधी आपण आपल्या प्रेमळ व्यक्तीला जपत एक आनंदाने त्या नात्याची पु:नबांधणी करू शकतो.....!! 



(शब्दरत्न)*

Comments

Popular posts from this blog

एक नातं....

वाट पाहताना..........!

गणित आयुष्याचं........