रक्तापलीकडचं एक अनोखं नातं.........!!
कधीच वाटलं नव्हतं कि दीदीचं नि माझं एवढं घट्ट नातं तयार होईल म्हणून .... प्रत्येक गोष्टीत कसं निष्णात व्हावं यासाठी तिची कायमच धडपड चालू असते, चालू असते तिची एक खास पडझड सतत सकारात्मक राहावं यासाठी, वेळेची तर फारच बांधलेली म्हणजे वेळेचे काम हे त्याच वेळेस व्हायला हवं, हा तर कायमच चालत असलेला तिचा हट्ट असतोच असतो. योगा तर रोजच करते जे तिला अजून positive आणि glorious बणवते. चेहर्यावर सदाबहार एक गोड हास्य ठेवणारी माझी लाडकी अन् मोठी बहीण. अनेक गोष्टी मी दिदीकडनं शिकवल्या आहेत आणि अजूनही शिकत आहे, जे मला माझ्यातील मी पणा दूर करून माणुसकीचे धडे गिरवण्यास प्रोत्साहीत करते.
दीदीबद्दल कितीही बोलावं तर शब्द कमी पडतील. माझ्या आयुष्यात मला पहील्यांदा मिळालेली जी माझ्यात सदैव च चांगले बदल व्हावेत यासाठी मला घडवण्यात तयार असते. माझ्यासाठी भावना अनेक पण व्यक्ती ती एक आहे..... अनमोल..... अविश्वसनीय....प्रेमळ......कधी कधी रागाच्या भरात माझ्या चांगल्यासाठी बोलणारी अन् प्रसंगी कान पिरगळून पाठीत एक धपाटा देणारी ही आहे.....पण चांगली गोष्ट केली तसेच माझ्या लेखाला ट्विट करून काही चुकलं तर सांगून ती चुक पुन्हा नाही करायची अशी प्रेमाची थाप ही एका गोड मिठीसह ती मला नेहमीच देत राहते.....!!
माझ्या आयुष्यात आताच आलेली पण अनेक चांगल्या गोष्टी शिकवत राहणारी माझी खास बहीण ......"कल्याणी दिदी" माझ्या चांगल्या गुणांचे कौतुक अनेकांना सांगणारी....पण तेवढ्याच ताकदीने चुकले असेल तर रागावणारी बहीण.... एक आदर्श, एक मैत्रीण, एक motivator आहे ती माझी.....!!
अनेक चांगल्या सवयींचा आधार जिला आहे, चांगल्या विचारांची सोबत जिला आहे....इतरांचे भले व्हावे असे नेहमीच वाटणारे....आपल्या छोट्यात छोट्या कामातून दुसर्यांना मदत व्हावी असं जिला नेहमीच वाटते.......ती म्हणजे कल्याणी दिदी....!! माझ्यातील चांगल्या गुणांना बाहेर काढण्यासाठी मला अशीच कधी प्रेमळ तर कधी रागाच्या दोन शब्दाने मदत करत राहा..... वेळ आलीच तर जोरदार कान पकडून धपाटा द्यायलाही कधीच विसरू नको.....!!
कधी कधी खंत वाटते कि मी तु सांगितलेल्या काही गोष्टी तेव्हाच आत्मसात केल्या असत्या तर मला खरंच खूप फायदा झाला असता, पण आता त्या चांगल्या सवयी मी नक्कीच आत्मसात करतेय ज्या तु मला माझ्या भल्यासाठी सांगितल्या होत्या...मान्य आहे अगं थोड्या उशीरा चालू करतेय पण पुढील आयुष्यात मला नक्कीच एक पाऊल ध्येयाच्या दिशेने पुढे टाकण्यास मदत करतील, सोबतच माझ्यातील "मी" बाहेर काढत एक आदर्श व्यक्ती बणण्यास मला जरूर सक्षम बनवतील....!! तुझ्याकडून बरंच प्रेम एका मोठ्या बहीणीचं मला मिळत आलंय नि ते सदाकाळ मिळत राहील ही खात्री आहे दिदी. तुझं माझ्यावर खरंच खूप प्रेम आहे जे मी क्षणोक्षणी अनुभवते नि माझंही तुझ्यावर आहे पण ते सांगता नाही येत केवळ अनुभवता येते.
तु सदैवच सदाबहार अन् सदाकाळ आनंदी राहावी, तुझ्या सर्व ईच्छा आकांक्षा पूर्ण होवोत, तुझ्या मेहनतीचं फळ मिळत तुझ्या मेहनतीच्या यशाने तु आकाशही काबीज करावं..... तुला आरोग्यदायी अन् आनंददायी जीवन लाभो, मला तुझा असाच गोड सहवास मिळत राहो, यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना करते...... अन् तुझ्या भावी आयुष्यासाठी तुला खुप खुप शुभेच्छा देते........🌺💐💐
-तुझी छोटी पण खोडकर बहीण
भाग्यश्री
Comments
Post a Comment