अनुभवातून जगतांना......!!
कुण्या एकाच्या येण्याने वा जाण्याने का एवढं हरवून जावं.....?? पण स्वत:च्या गोड अन् अविश्वसनीय company ची साथ मात्र नेहमीच बनावं....!! कारण नाही या जगात एकही गोष्ट permanent अन् नाही या जगातील एकही व्यक्ती आपल्यासाठीही permanent आणि आपणही त्यांच्यासाठी permanent नाही आहोत. कारण ती त्यांची life मग तेच ठरवतील त्याच्या life मधील त्यांच्या व्यक्ती कोण अन् परक्या व्यक्ती म्हणजेच जे "लोकं" या सुंदर पदवीत मोडतात असे कोण हे ज्यांचं तेच ठरवतात. पण असो शेवटी ज्याची त्याची life. ते सर्व त्यांच्या जीवनात खुप खुश आहेत मग आपण याच गोष्टीत आनंद मानत आपणही आपल्या जीवनाचा आनंद घेत एक एक श्र्वास आत घ्यायचा प्रेमाचा अन् असलेले कुविचार अन् घृणाही बाहेर टाकायची त्याच श्वासासोबत. कुठलीही गोष्ट किंवा व्यक्ती चिरकाल टिकणारी नसतानाही आपण कुण्या एकाच्या ह्रदयात येण्या जाण्याने आपण कधी कधी अन् बर्याचदाही किती disturb होतो राव.... पण आपल्या ह्रदयाचं दारही एवढं पक्क असावं कि त्यात सहज कुणी येताच कामा नये आणि येतही असेल तर त्याची खबरदारीही आपल्यालाच घेता यायला हवी नाहीतर कुणीही येतं अन् आपलं मन...