नात्यातील दुरावा..... अन् शिकवण आपलेपणाची....!!


दुरावा ही थोडा हवाच असतो कधी कधी नात्यांमध्ये....कारण त्याशिवाय नात्याची कींमत कळत नाही न राव. पण तो दुरावाही जास्तकाळ नसावा नाहीतर नात्याचे महत्त्व कळायच्या ऐवजी नातंच संपुष्टात येईल. परंतु जेही नातं खरं असतं न, अन् ज्या व्यक्ती आपल्या असतात त्या कधीच दूर जात नाहीत, जरी शरीराने दूर गेल्यात पण मनाने त्या सदाकाळ सोबतच असतात, आपल्या सुखदुःखात सोबत राहतात, आपल्या कठीण काळात खंबिरतेने उभं राहण्यास मोलाचं बळ देतात. म्हणून म्हणतो जास्त तर नाही पण आयुष्यात एकतरी व्यक्ती अशी कमवावी जीचा आपल्यावर अन् आपलाही तिच्यावर अतोनात विश्र्वास असेल, जीचा आपल्या कार्यक्षमतेवरही प्रचंड विश्र्वास असेल. कारण कधी काळी जेव्हा ही आपण खचून गेलो असू तेव्हा या आपल्या व्यक्ती कायमच आपल्या पाठीशी उभ्या असतात. कधी प्रत्यक्षपणे तर कधी अप्रत्यक्षपणे ही कायमच धुर देत मनाला उभारी आणण्याचं अविश्वसनीय काम नेहमीच करत असतात.

Comments

Popular posts from this blog

एक नातं....

वाट पाहताना..........!

गणित आयुष्याचं........