जेव्हा तो बोललेला.......
काल सहजच क्रिष्णासोबत थोड्या गप्पा मारत होते, अन् गप्पा मारता मारता विषय निघाला.....
स्त्री चारित्र्याचा तो विषय होता त्यामुळे तर आणखीनच तळपायाची आग मस्तकात गेली, राग तर कधी येत नाही पण प्रश्र्न चारित्र्यावर आलेला, मग मलाही शांत राहावेलं गेलं नाही......!!
आधी मस्त गोड गोड बोलणं चालू होतं, थोडी तब्बेतीचीही विचारपूस झालीच म्हणा.
तो म्हणाला कि आजकाल मुली सर्वच करून मोकळ्या होतात म्हणे, आजकालच्या मुली वर्जिन नाही राहील्यात, असंही तो बोललेला. त्यामुळे प्रचंड राग आला. मग मी ही त्यावर म्हटले की, हो तुझंही बरोबरच आहे म्हणा, पण हेही शाश्वत सत्य आहे कि, मुलीही एकट्याने ते सर्व करून चुकत नाही तर त्यात तुम्हा मुलांचा ही समावेश असतोच असतो.
मग आम्ही मुलींनीही म्हणावं कि आजकालचे मुलंही वर्जिन राहीलेले नाहीत........!! मग का यामध्ये केवळ महीलांना आधी मारलं जावं त्यांच्यावर आरोप करून....??
मान्य आहे कि, सेक्स ही नैसर्गिक क्रिया आहे आणि ते करणं त्यात काही चुकीचं नाही पण ते करताना आपल्या भावना कशा आहेत, यावर बरंच काही डिपेंड असतं. नाहीतर मग रेप ही चांगलाच ठरवला गेला असता. ही एक नैसर्गिक क्रिया असूनही कधी कधी तर यालाही अपवित्र मानलं जातं.....!! जर ती एक अपवित्र मानलं अन् ती प्रक्रिया जर थांबवली तर कठीण आहे न राव जग पुढे जाणं. यात काहींना याबद्दल तिरस्कारही वाटतो. का .....?? तर कारणही तेवढंच भयंकर म्हणावं लागेल, कारण कुठेही पुस्तकी शिक्षणामध्ये लैंगिक शिक्षण दिले जात नाही आणि त्यामुळेच अनेक स्रीअत्याचार माझ्या भारत मातेत घडताना दिसतात.
Comments
Post a Comment