अनुभव एक नारी म्हणून जगतानाचा.....
खुप अभिमान वाटतो कधी कधी अन् बर्याचदाही मुलगी म्हणून जन्माला आल्याचा,
पण तेवढाच तिरस्कारही येतो न बदलणार्रा समाजाच्या बुरसट विचारसरणीचा,
मिळालं स्वातंत्र तरीही अनुभव येतोच आहे कधीकाळी पारतंत्र्याचा,
तरीही आशा ठेवून थोडं खंबिरतेने जगते आहे, बदलणार्रा परिस्थितीचा,
कपाळाला टिकली, हातात बेड्या सारख्या बांगड्या पण थोडा आनंद ही आहे संस्कारांना जपण्याचा,
कधी कधी द्वेषही येतो सांगताच क्षणी मुलगी म्हणून जन्माला आले तर वडीलांनी चेहरा न पाहण्याचा,
पण काय करावं राव आता थोडं त्यांच्या भावनेचाही येते किव पायवंडा घसरताना महिलेचा,
तरीही स्वत:च्या कर्तृत्वाची अन् अस्तित्वाची जाणीव ठेवत अभिमान बाळगावा "नारीशक्तीचा"....!!
- राधेक्रिष्णा
Comments
Post a Comment