एक वाट......!!



एक वाट निश्र्चित असावी ध्येयाची ध्येयापर्यंत जाण्यासाठी,
एक वाट कायमच आपली असावी मेहनतीनं यश काबीज करून आनंद घेण्यासाठी,
एक वाट सदैवच मोकळी असावी आपल्या जिवलगांसाठी,
एक वाट ती ही असावी जेव्हा कुणीच नसताना आपणच आपल्याला आपलेपणाची जाणीव करून देण्यासाठी,
एक वाट निर्माण करावी जे पैशाने श्रीमंत नसून मनाने प्रचंड शीलवान आहे अशा माझ्या  गोरगरिबांसाठी,
एक वाट दिव्यांगासाठीही तयार करावी, एक मित्र बनून मानवतेचे पालन करण्यासाठी,
एक वाट कायमच मोकळी असावी आपल्यापर्यंत येत इतरांचे दु:ख मांडून त्यांचा मदतेचा हात बनण्यासाठी......!!

Comments

Popular posts from this blog

एक नातं....

वाट पाहताना..........!

गणित आयुष्याचं........