एक अनमोल संरचना........"नातं"
नात्यांच्या संरचनात्मक बंधनात असताना......
नातं थोडं घट्ट असावं म्हणतो, जे कधीही तुटणार नाही, जे शेवटपर्यंत साथ देईल. पण त्यात स्वार्थ मात्र मुळीच नसावा आणि असेल तर त्याला नातंही म्हणूच नये....!! पण जी माणसे आपली असतात ती कधीच आपली साथ सोडत नाही, आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात, आपल्या यशापयशात धीर देतात ज्यामुळे आपली व्यक्ती दुरावण्याची जराही भीती उरत नाही. परंतु सध्याच आयुष्यात आलेली, जिने कधीही आपल्याला जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही, पण मात्र आपल्याशी तिच्या स्वार्थापायी आपल्या मनाला जिंकण्यासाठी थोडं वरकरणी तिचं गोड बोलणं मनाला भाऊन तिच्या त्या खोट्या शपथा देणं, किंवा खोट्या खोट्या अटीला बडी पडून आपल्या जिवलगांनी दिलेल्या शिकवणीला कधीच विसरता कामा नये. कारण शेवटी आपलीच माणसे आपल्याला आणखी धाडसी बनण्याचं शिकवीत असतात. मग कुणाच्या सानीध्यात येऊन त्या संस्कारांना का बरे विसरावे.......?? एक वाक्य ध्येयाच्या वाटेवरून चालता चालता एका अविश्वसनीय मार्गदर्शकाने हे कानी टाकलं होतं, कि "सर्वच गोडबोली माणसे हे चांगली नसतात" पण आता त्याचा प्रत्यक्ष जीवनात अनुभव देखील आलाय. म्हणून म्हटलं जातं कि, माणसं ओळखून त्यातील आपल्या माणसांना जपता आलं कि आयुष्य खूप सुंदर बणत जातं, नाहीतर माणसांच्या गर्दीतील एकटंपणही अनुभवास यायला जराही अवधी लागत नाही. शेवटी आपली माणसे ही आपली असतात जी सदैवच आपलेपणाची भावना कळत नकळत हिरवाई सारखी मनाला समृद्ध करत जातात नि कधीकाळी वाळवंट झालेल्या आयुष्याला मायेचं गार पाणी घालून त्यात विविधरंगी फुलांची सजावट करण्यासाठी मदत करतात, म्हणूनच म्हणतो सदाकाळ अन् सदाबहार जपता यावीत ही आपली माणसे.......!!
नातं हे फार उबदार असावं, जे निस्वार्थीपणे निभावता यायला हवं. नाहीतर या भुलभुल्लया झालेल्या या जगात आपणही हरपून जातो नि कधीकाळी आपलंच अस्तित्व गमावून बसतो अन् गमावून बसतो तो आनंद आपल्या मनाचा. नातं असंही नसावं जिथे आपला स्वाभिमानच हरवल्यागत वाटायला लागेल, हे जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीला खुप जपण्याचा प्रयत्न करतोय पण तरीही तिला ते उमजत नसावं तेव्हाच. कारण नातं कुठलंही असो सेल्फ respect, eago हे बाजूला सारून स्वछंदी मनाने निभावावं लागतं, हेही तेवढंच शाश्वत सत्य आहे, असं मला वाटतं...!!
नात्याचं सुंदर फुल हे तेव्हाच आणखी सुंदर दिसतं जेव्हा नात्यांचं बीज हे एकमेकांना जपण्यापासून ते एकमेकांच्या भावना समजून घेईपर्यंत तर एकमेकांच्या सुख दुःखाचे सोहळे सोबत साजरे करेपर्यंत च्या अनेक प्रोसेस पार पाडणं तेवढंच महत्त्वाचं असतं, सोबत त्याने नातं नावाचं अनोखं झाडंही आणखीनच खुलून दिसतं.
निर्जीव मोबाईलचं उदाहरण जरी घेतलं ना तेव्हा थोडी मानवी मनाचीच लाज येते... कारण त्यातून एखादा डाटा जरी डीलीट करायचा झाल्यास "खात्रीय ना.....!!" असा प्रश्न कुठेतरी तो विचारतो. पण मग मानवाला भावना असूनही तो का कधी भावना नसल्यागत वागतो दुसर्यांच्या भावना दुखावून. म्काहींच्या बाबतीत तर असं जाणवयास येते की, हिला तर भावनाच नाहीए, कारण कुणाच्या भावना दुखवून चटकन स्वत:च्या भल्यासाठी नातं निभावणं कुणा कुणाला तर भारीच जमतं. मग भावना ही लाथेने तुडवल्यागत होते. पण आपण आपले संस्कार कदापि विसरू नये. आपण मात्र स्वत:शी प्रामाणिक राहत एक एक पाऊल टाकत जावं. माझे मोठेबाबा... आज जरी ते आमच्यात नसले तरी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे त्यांनी दिलेला एक अनमोल धडा आजही ध्यानीमनी आहे आणि शेवटच्या क्षणापर्यंत राहणार, तो असा कि "कुत्र आपल्याला चावलं म्हणून आपण त्याला चावायचं नसतं पिल्ला..." त्यांचे हे शब्द मला माणसांशी माणसासम वागण्यास कायम प्रेरीत करत आपल्यातील आपली माणसे जपण्यास एक अविश्वसनीय आनंद देते.
शेवटी आपली माणसे ही गजबजलेल्या दुनियेतील मोगर्याच्या फुलांप्रमाणे नितळ अन् तेवढीच सुगंधीही जी नेहमीच आयुष्य रसगंधमय करत असतात. कारण येथे अपेक्षा ह्या नसतात ज्यामुळे नातं हे अजूनच वाढत जातं, जे जगण्याचं बक्कळ बळही देत असतं.
म्हणूनच म्हणतो आपली माणसं जपण्यात कुठलीही कसर नसावी,
म्हणूनच म्हणतो आपल्या माणसांच्या आनंदासाठी कधी कधी आपला स्वाभिमानही बाजूला सारावा,
म्हणूनच म्हणतो एखादं छोटंसं चांगलं कार्य जरूर करावं ज्यातून त्याच्या चेहऱ्यावर एक गोड हास्य बघायला मिळेल......!!
दिवसागणिक येत जाणार्या अनुभवातून शिकत जाणं यालाही आयुष्यच म्हटलं जातं.......!!
पण असो शेवटी ज्याचे त्याचे विचार.....!!
आयुष्यात एकतरी नातं असं कमवावं जे जीवनाचं सोनं करेल. पण ते क्षणिक नसावं, ते चिरकाल टिकणारं असावं......!!
पण थोडी खंतही वाटते राव कि त्या व्यक्तीने केलेल्या एका चुकीमुळे आपण तिला चुकीचं नाही ठरवू शकत.....!! पण तिने केलेल्या चुकेची तिला जाणीव व्हावी आपण एवढंच करावं नि आपला चांगुलपणा जपत एक माणूस म्हणून जगण्याचा आनंद भरभरून घ्यावा....!!
Comments
Post a Comment