अनुभवातून जगतांना......!!




कुण्या एकाच्या येण्याने वा जाण्याने का एवढं हरवून जावं.....?? पण स्वत:च्या गोड अन् अविश्वसनीय company ची साथ मात्र नेहमीच बनावं....!! कारण नाही या जगात एकही गोष्ट permanent अन् नाही या जगातील एकही व्यक्ती आपल्यासाठीही permanent आणि आपणही त्यांच्यासाठी permanent नाही आहोत. कारण ती त्यांची life मग तेच ठरवतील त्याच्या life मधील त्यांच्या व्यक्ती कोण अन् परक्या व्यक्ती म्हणजेच जे "लोकं" या सुंदर पदवीत मोडतात असे कोण हे ज्यांचं तेच ठरवतात. पण असो शेवटी ज्याची त्याची life. ते सर्व त्यांच्या जीवनात खुप खुश आहेत मग आपण याच गोष्टीत आनंद मानत आपणही आपल्या जीवनाचा आनंद घेत एक एक श्र्वास आत घ्यायचा प्रेमाचा अन् असलेले कुविचार अन् घृणाही बाहेर टाकायची त्याच श्वासासोबत.

कुठलीही गोष्ट किंवा  व्यक्ती चिरकाल टिकणारी नसतानाही आपण कुण्या एकाच्या ह्रदयात येण्या जाण्याने आपण कधी कधी अन् बर्याचदाही किती disturb होतो राव.... पण आपल्या ह्रदयाचं दारही एवढं पक्क असावं कि त्यात सहज कुणी येताच कामा नये आणि येतही असेल तर त्याची खबरदारीही आपल्यालाच घेता यायला हवी नाहीतर कुणीही येतं अन् आपलं मन दुखवून रवाना ही होतं त्याची माहीती काढता काढताच अर्धा वेळ निघून जातो याचाही थांगपत्ता लागत नाही राजे हो कधी कधी तर. मग काय......?? मग आपणच याचं रहाटगाणं चालू ठेवतो, ती नाही का खुप छान होती यार, खुप छान बोलायची, खुप सुंदर रीतीने समजावून पण सांगायची पण काय करू राव तिनेच खुप दुखावलं ही, मनाला तोडलं यार तिने..... अशा गोष्टीही आपणच करतो मग......!! मलाही राग येतो मग अशा प्रसंगांचा may be तुम्हालाही येतच असावा. तरीही व्यक्ती जपण्याची तयारी आपली असावी पण ती जर खुप डोक्याच्या वर जात असेल तर त्या व्यक्तीशी न बोललेलच बरं म्हणावं, एकदा कळलं कि समोरचा व्यक्ती खोटं खोटं राज्य करतेय तर मग का म्हणून अशा खोट्यांच्या जगात आपणही भुलभुल्लया प्रमाणे भरकटून जावं. त्यापेक्षा तर कित्येक पट चांगलंय स्वत:शीच एक प्रेमाने घट्ट मिठी मारत हसत हसत आयुष्य काढावं. अनुभव घेत व्यक्तींची पारखही करता यायला हवी जीवन आणखीनच सुंदर बनत जाईल आणि वाटलंच कधी एकटं तर मग स्वत:चीच एक मैफल निर्माण करत गावं आनंदाचं गाणं..... हा अनूभवही माणसाला जगणं शिकवतो, अन् बर्याचदा दु:खातून बाहेर निघण्यासही मदत करतो. मग खुप छान वाटतं, हलकं हलकं वाटतं अन् एक वेगळीच रंगत आयुष्याला प्राप्त होते.

म्हणून म्हणतो काहीही झाले तरी चालेल पण कधी स्वत:ची साथ सोडायची नाही. 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

एक नातं....

वाट पाहताना..........!

गणित आयुष्याचं........