Posts

माझ्यातील मी....

माझ्यातील "मी" जगत असते कधी स्वतःशी लढते तर कधी स्वतः विरुद्ध उभी राहते, ठोकर लागता पडते  कधी कधी सावरते वेळ आली कि ओसंडून वाहते, हसण्याला माझ्या तमा नसते कधी असंख्य गोंधळाला लपवते तर कधी प्रश्नांचा गुंता सोडवते, स्वप्नांची भरारी घेत राहते कधी मेहनत करते तर कधी जिद्द अन् चिकाटीला सोबत ठेवते, स्वातंत्र्य मला आवडते कधी संस्कारांना आठवते तर सदा आई बाबांना स्मरते, माझं आयुष्य मी भरभरून जगते कधी आसमंताला कवेत घेते तर कधी स्वतःच स्वतःचं जग निर्माण करते..!! _भाउ काळे 

"75 years of NCC"

💫75 Years of NCC💫 अरे NCC का घेतलंय..?? काय आहे त्यात इतकं..?? उगाच वेळ व्यर्थ जातो हं त्यात. पण खरं म्हणजे प्रत्यक्षात इथे आल्यानंतर कळते कि खरंच NCC काय आहे. कारण इथे नुसतं लेक्चर्स आणि ड्रिल घेतली जात नाही तर देशाचा एक मजबूत पाया इथे घडवला जातो नव्हे नव्हे तर एका अनोख्या अन् अविश्वसनीय व्यक्तिमत्त्वाला आकार दिला जातो आणि मग तो हळूच देशोधडीला सोपवला जातो. मग अजून काय हवंय..??  आज बघितलं तर आझादीचा अमृतोत्सव आपण साजरा करत आहोत आणि या अखंड 75 वर्षाच्या कालावधीत देशाचा पाया प्रचंड मजबूत करण्यासाठी हातभार लावून देशाचा एक जबाबदार नागरिक घडविला जातो तो इथूनच....अर्थातच NCC. आजपासून ठिक 75 वर्षांपूर्वी म्हणजेच 15 जुलै 1948 रोजी NCC (National Cadet Corps) स्थापन करण्यात आलं आणि Girls division हे जुलै 1949 ला सुरू करण्यात आलेलं. NCC क्षणाक्षणाला  "Unity and Discipline" हेच ध्येय घेऊन कायम भ्रमंती करत असते. आणि आज अवघ्या भारत देशात 17 directorates आहेत आणि हे 700 Army wing, 73 Naval wing आणि 64 Air Squadrons मधे विभागले गेलेले आहेत. NCC cadet म्हणून वावरताना प्रत्येकाचा अनुभव हा नि...

गणित आयुष्याचं........

Image
इतक्या मोठ्या आयुष्याचं साधं गणित आहे, सुख-दु:ख, यश-अपयश  यांची वजाबाकी करणेची आहे, जे पुढ्यात येईल त्यातून अनुभव घेत पुढे  जाणेच आहे, धगधगत्या वास्तवात  स्वतःचं अस्तित्व जपणेची आहे, ना भीती वादळांची ना धास्ती संकटांची तू उर्मी ठेव ना तुझ्यात त्यांच्याशी लढण्याची, तुझ्यासाठी कटकारस्थाने ही रचली  जातील अनेक पण त्यातूनही वाट तुला काढणेची आहे, अंधारातूनही मार्ग काढण्याची शक्ती तुझ्यात आहे, तु चालत राहा, नियतीला ही  तुझ्या मेहनतीपुढे झुकणेची आहे..!! _भाउ काळे

नकळत कित्येकदा पडलेला त्याचा मुडदा......

Image
नकळत कित्येकदा पडलेला त्याचा  मुडदा मी डोळ्यांदेखत पाहीला, न जाणे कोणती ती सहनशीलता देवाने दिली वाट्याला, सारं आयुष्य आणि आनंदाचा उत्सव होतं क्षणीक साथीला, अचानक वादळ आलं, होतं सुख तेही  गेलं, लाभलं दु:ख सोबतीला, चांगली माणसं, चांगले विचार मिळाले श्वासाश्वासाला, सारं काही विरून गेलं, वणव्यानेही  आता रौद्र रूप धारण केलं, थांबला मग तोही अखेर राख देऊनी हाताला, दिवस गेले, क्षणही गेले, काही न उरले हिशोबाला, आठवणींचा तो फापटपसारा मरणासन्न करतो त्याला, पडला तो कित्येकदा, अनेकदा जळून ही विझला, पण आता निघालाय अक्षम्य पंख पसरून आकाश कवेत घ्यायला, _भाउ काळे

मैत्री म्हणजे....

मैत्री म्हणजे ज्वलंत ज्वाला, दु:खातही आनंदाचा प्याला, मैत्री म्हणजे सौख्याची आशा, संकटात ही प्रेरणेची भाषा, मैत्री म्हणजे धागा प्रेमाचा, शब्द कठीण समयी साथ देण्याचा, मैत्री म्हणजे अक्षम्य वारा, क्षणात क्षीण दूर करतो सारा, मैत्री म्हणजे मार्गावर आणणारा धपाटा, राग, प्रेम, भांडणं यांचा भलामोठा साठा....!! _भाउ काळे

श्वास थांबतोच असे नाही......

Image
रस्ता ओलांडताना पाय थबकतोच असे नाही, पाय थबकताना क्षणासाठी श्वास थांबतोच असेही नाही, श्वास थांबताना जीव कासावीस होतो असे नाही, जीव कासावीस झाला कि भीतीने हात धरावा असेही नाही, एकेक पाऊल पुढे स्वछंदीपणे टाकत राहावा असे नाही, पण पाऊल टाकताना थोडा विसावा घ्यावा असेही नाही, विसावा घेताना पाऊलवाटेचाही विसर व्हावा असे नाही, विसर होऊन तिथेच बसावे असेही नाही, स्मरण करावे निरंतर नि गुंतून बसावे त्यातच असे नाही, पण गुंतून ही पुन्हा स्वतंत्र व्हावे असेही नाही, स्वतंत्र होताना विचार करावा बंधनाचा असे नाही, बंधनात ही असताना वावर असावा निरभ्र समुद्राचा असेही नाही, आकाशाची व्याप्ती अशीच मोजता यावी असे नाही, मोजण्यासाठी आकाश..जावं त्याच्याच कवेत असेही नाही, चालतच जावे निरंतर कुठलाही पूर्णविराम न घेता असे नाही, पूर्णविरामानंतर सारं काही नि:श्वास घेत मृत पावते असेही नाही, _भाउ काळे

जीर्ण झालेल्या त्या VMV ची आत्मकथा....

Image
कधीकाळी निसर्गाच्या सानिध्यात राहणारी मी आता तो सहवास शोधत असते,  माझ्या छायेत तासनतास बसत गप्पा करणारे मित्रमंडळी नुसतेच बघत राहते, शिक्षक-विद्यार्थ्याचा निवांत संवाद आता फक्त आठवणीतच आठवत असते, उन्हाच्या कडाक्यात माझा आसरा हुडकणारे आता मला कमीच मिळतात, माझ्या रंगांच्या जुन्या पापुद्र्याचे थरच्या थरं आजकाल फक्त गळून पडतात, वय झालं आता सारंच झालं म्हणून कि काय माझी साथ देणारे ते डगडही एकेक करून साथ सोडतात, मला बांधते वेळी लावले गेलेले ते झाडेच आता मला माझी उरली दिसते, माझी जुनी इमारत सोडून सारं कसं नवं नवं वाटत मला परकं करत राहते, शिशिरा प्रमाणे सारं काही ओसाड झालेलं माझं आयुष्य वसंताच्या येण्याची वाट पाहत दिसते, एकेकाळी माझ्या आयुष्याच्या, सारे काही स्वच्छ अन् बेभान असायचे, स्वच्छंदी जगणारी मी ही प्रेमी युगलांच्या आणाभाका ऐकत राहायचे, सारं काही फक्त न्याहाळत स्वतःला मिठी मारत हजारदा स्वतःतच हरपून जायचे, _भाग्यश्री उमेश काळे