नकळत कित्येकदा पडलेला त्याचा मुडदा......




नकळत कित्येकदा पडलेला त्याचा 
मुडदा मी डोळ्यांदेखत पाहीला,
न जाणे कोणती ती सहनशीलता
देवाने दिली वाट्याला,

सारं आयुष्य आणि आनंदाचा उत्सव
होतं क्षणीक साथीला,
अचानक वादळ आलं, होतं सुख तेही 
गेलं, लाभलं दु:ख सोबतीला,

चांगली माणसं, चांगले विचार
मिळाले श्वासाश्वासाला,
सारं काही विरून गेलं, वणव्यानेही 
आता रौद्र रूप धारण केलं,
थांबला मग तोही अखेर राख देऊनी हाताला,

दिवस गेले, क्षणही गेले,
काही न उरले हिशोबाला,
आठवणींचा तो फापटपसारा
मरणासन्न करतो त्याला,

पडला तो कित्येकदा, अनेकदा
जळून ही विझला,
पण आता निघालाय अक्षम्य पंख पसरून
आकाश कवेत घ्यायला,




_भाउ काळे


Comments

Popular posts from this blog

एक नातं....

वाट पाहताना..........!

गणित आयुष्याचं........