मैत्री म्हणजे....
मैत्री म्हणजे ज्वलंत ज्वाला,
दु:खातही आनंदाचा प्याला,मैत्री म्हणजे सौख्याची आशा,
संकटात ही प्रेरणेची भाषा,
मैत्री म्हणजे धागा प्रेमाचा,
शब्द कठीण समयी साथ देण्याचा,
मैत्री म्हणजे अक्षम्य वारा,
क्षणात क्षीण दूर करतो सारा,
मैत्री म्हणजे मार्गावर आणणारा धपाटा,
राग, प्रेम, भांडणं यांचा भलामोठा साठा....!!
_भाउ काळे
Comments
Post a Comment