श्वास थांबतोच असे नाही......
पाय थबकताना क्षणासाठी श्वास थांबतोच असेही नाही,
श्वास थांबताना जीव कासावीस होतो असे नाही,
जीव कासावीस झाला कि भीतीने हात धरावा असेही नाही,
एकेक पाऊल पुढे स्वछंदीपणे टाकत राहावा असे नाही,
पण पाऊल टाकताना थोडा विसावा घ्यावा असेही नाही,
विसावा घेताना पाऊलवाटेचाही विसर व्हावा असे नाही,
विसर होऊन तिथेच बसावे असेही नाही,
स्मरण करावे निरंतर नि गुंतून बसावे त्यातच असे नाही,
पण गुंतून ही पुन्हा स्वतंत्र व्हावे असेही नाही,
स्वतंत्र होताना विचार करावा बंधनाचा असे नाही,
बंधनात ही असताना वावर असावा निरभ्र समुद्राचा असेही नाही,
आकाशाची व्याप्ती अशीच मोजता यावी असे नाही,
मोजण्यासाठी आकाश..जावं त्याच्याच कवेत असेही नाही,
चालतच जावे निरंतर कुठलाही पूर्णविराम न घेता असे नाही,
पूर्णविरामानंतर सारं काही नि:श्वास घेत मृत पावते असेही नाही,
_भाउ काळे
Comments
Post a Comment