शब्द माझे, भावना तिच्या.....!!
असतात हो अवतीभवती जिवाला जीव लावणारे, सांत्वन घालणारे, भरभरून प्रेम करणारे.....पण कसंय आपल्याला ज्या व्यक्तीकडनं सांत्वन हवं असतं तेच मिळत नसेल तर खुप खाली खाली वाटतं....!! खुप अस्वस्थता येते....पण असते थोडं समाधान, चला कुणीतरी आहे ना सोबत....आपण एकटं तर नाही ना...!! मग त्या खालीपणाला सोबत घेऊन मानावा लागतो आनंद...!! शेवटी आपण जे दिलं ते तर परत मिळणारच ना..जेवढं प्रेम दिलं तेवढं परत मिळतंच...!!
माणूस कितीही स्वार्थी असला तरी हे जग तेवढं स्वार्थी नाही हो...म्हणजे तो एक सिद्धांत आहे ना, ""Law of attraction" चा..!! जेवढं दिलं ते आज ना उद्या मिळणारंच. ह्यावर मात्र पूर्णपणे विश्र्वास आहे हो, म्हणून कुणी आपल्याशी कसेही वागो...तिने मात्र स्वत:चा चांगुलपणा सोडायचा नाही, हा प्रणच घेतलाय जणू असंच वाटायला लागतं ब-याचदा...!!
वाटतं कधी कधी.....ते नात्याला नाव देणं आणि मग चौकटीमध्ये मस्तपैकी बांधल्या जाणं...फार गोड हं..!! हे तरी बरंय त्यांना तुरूंगात तरी बांधलेलं नाही निदान, म्हणजे कसंय तु माझी बहीण ना मग ते ....ते बहीणी एवढंच नातं निभावशील...?? जास्त नाही, बरं का..?? म्हणजे एकदातरी मैत्रीणीसारखं बोलून, थोडासा संवाद साधून, माला काय वाटते, हे जाणून तर मुळीच घ्यायचं नसतं...!! असंच काहीसं आपलं सो कॉल्ड ट्रेडीशन असावं कदाचित...!! पण असो, जास्त काय बोलावं म्हणा, "राय नं तु तुया आयुष्यात सुखी अन् मी माया संसारात गुंग...!!" हे असंच चालतं अनेकदा. पण मुळ काही वेगळंच असतं..!!
बोलावं वाटतं खुप काही, सांगावं वाटतं बरंच काही, कुठे तरी डोकं ठेवून धायमोकळून रडावसं वाटतं....!! पण तरीही शांत राहावं नव्हे नव्हे तर राहण्याची वेळच येते अनेकदा..!! मग अश्रू कोरडे होऊन भावनाही आटून जातात अक्षरशः..!! असो, त्यापेक्षा "तुच तुझा सांगाती, बरंय कि"...!!
_#शब्दरत्न
Comments
Post a Comment