आजच तर होती हो ती......??
आता असणारी ती माहीत नाही हो कुठे गेली,
आजच तिच्याशी बोलणं झालं होतं हो
अन् यानंतर ती फक्त आठवणीतच राहून गेली,
मनाने खुप निर्मळ होती हो पण काय सांगावं
तिची संगत आमच्यासोबतची तिथपर्यंत च असावी अन् त्यानंतर ती देवालाही मान्य नसावी,
आहे तोपर्यंत...
होईल तोपर्यंत...
करावं बोलणं अगदी मनापासूनचं...
राहावं प्रेमाने सदोदितपणे...
भांडण ही करावीत पण मग समजूतही घालावी...
कारण आताच असणारी व्यक्ती कायमच सोबत असेल नाहीच ही खात्री, म्हणून सोबत आहे तिथपर्यंत साथ द्यावी आणि आठवणी गोळा करून ठेवाव्यात हृदयाच्या खजिन्यात. ती नाही तर तिच्या आठवणी तरी आनंद देईल....कारण तेव्हा मनाला फक्त एक साद हवी असते काळजाची..!! पण मनच ना हो ते शेवटी स्विकारायलाच तयार नसतं.....अन् त्यात व्यक्ती ही जवळची असेल तर मग मन हे पूर्णपणे गढून जातं त्याच त्या आठवणीत..!!
आज धनतेरस....सर्वांच्या घरातील दिवे लागले अन् ती संगतीने अगदी दिपमाळ तयार करून गेले...मनाला तेजोमय साद घालून गेले, पण त्यांची "ती" सोडून गेली होती अन् त्यांच्या घरात आज अंधाराचीच रात्र होती...!! काय करावं ..?? आठवण तर येणारच ना कारण तेव्हापर्यंतच्या आयुष्यात
Comments
Post a Comment