ए पोरी......तो "ब्रा" चा बेल्ट बाहेर आलाय जरा, तो अंदर टाकशील बघू.....!!
खरंतर, बागेच्या गटार्यातील किड्यांच्या तोंडून ऐकलेलं हे वाक्य. हे वाक्य ऐकून ना...कानं बहीरे झालीत आणि मन बोअर झालंय सप्पा,हे बुरसटलेलं वाक्य ऐकून. पण खंत या गोष्टीची वाटते कि, बाईचं अस्तित्व लाभलेल्या स्रीनेही याबद्दल गॉसिप कराव्यात ही गोष्ट काही पचनी पडत नाही, एखाद्या मुलीच्या किंवा मग स्त्रीच्या ब्राचा पट्टा बाहेर दिसला रे दिसला तरी त्यांचं मागे लुटबूट चालू झालेलं असते....आणि मग एखादी असतेच ती म्हणते मग....'एक पोरी....!! ते बघ "ब्रा" चा पट्टा बाहेर आलाय ते नीट कर बघू....!!'
मान्य आहे, कि स्तन किंवा मग सोप्प्या शब्दांत सांगायचं झाल्यास बुब्स हा पुरूषी आकर्षणाचा भाग असतो, कारण निसर्गाचा नियम आहे_____तो म्हणजे "आकर्षण"; पण त्याकडे वाईट नजरेने पाहावं हा काही कुठल्या पुस्तकांत लिहीलेला नियम तर मुळीच नाहीये. इथे पुरूषही याबद्दल गप्पागोष्टी करतात. साहजिकच आहे, पण अरे एवढा तू भित्राय का...?? त्याबद्दल मग मुलींशीच गप्पा मारत जा कि, निदान तिच्या मनातली भीती तर दूर होईल आणि तुझ्या मनातले गैरसमज ही. पण नाही इथे तर गोष्ट वेगळीच आहे.
स्तनाचा आकार जास्त मोठा दिसू नये म्हणून आणि हो दूसरा मुद्दा अजून ते बुब्स चा वरचा भाग अर्थात निप्पल चा आकार त्यातून बाहेर दिसू नये म्हणून ते ब्रा घालून घुसमटलेल्या सारखं झालं तरी चालेल पण ते घातल्याबिगर न राहणा-या आजच्या आम्ही सा-या मुली अन् महीला. जीवाची घालमेल झाली तरी चालेल, जीव गुदमरला तरी चालेल. कारण तिच्यासमोर पर्याय नसतो ना. काय करावं....या सुंदर जगातील जे सुंदर विचारांच्या माणसांची बाग आहे त्यात काही मानवरूपी किडे आहेतच कि. मग मलाही म्हणावं वाटतं त्या काही विद्रुपांना, अहो जरा ते बनियात उतरवून एखाद्या दिवशी फिट्ट कसलेली ती "ब्रा" घालून बघावं आणि मग बोलण्याची हिंमत करावी. पण नाही तुम्ही पुरूषे तर ती बनियान ही ब-याचदा घालत नाही, का..?? का तर खाऊन-पिऊन, व्यायाम करून निघालेले सिक्स पॅक्स दिसण्यासाठी. का..?? तर त्यातून तुमची बाॅडी दिसावी यासाठी...!! अहो पण....!! पण आम्हा मुलींनाही काही शौक नाही हो, ब्रा घालून फिरण्याचा, जिवाच्या आकांतापायी घालावी लागते. आणि त्यातही एखाद्या दिवशी विदाऊट ब्रा बाहेर निघालं आणि ते जर एखाद्या बाईलाच दिसलं तरी तिचं खुसूर - पुसूर चालू होतं. आम्हालाही वाटत असेल कि हो, विदाऊट "ब्रा" थोडा नि:श्र्वास टाकावा ते, निवांतपणे मोकळा श्र्वास घ्यावा ते. पण नाही; दिवसभर कामाची वर्दळ आणि त्यात ही जीवघेणी ब्रा म्हणजे भारीच काम. मग दिवसभराची कामे सरल्यावर कुठे तिला रात्री झोपताना ब्रा काढून मोकळेपणाने श्र्वास घेता येतो.
अशी ही समाजाची विदारकता कधी थांबणारेय कुणास ठाऊक...??😔 लहानपणी नग्न अवस्थेत ज्या बापापुढे फिरायचो आज त्याच बापापुढे फिट्ट फिट्ट अन् नकोशी असलेली "ब्रा" घालण्याचा अट्टहास करणारा आमचा विद्रुप समाज. मी समाजाला ही दोष देणार नाही आणि आजच्या परिस्थितीला देखील; शेवटी काय हो..?? लहानपणी मिळालेली शिकवणच कि, लहानपणीपासनंच बुब्स असो वा मग मुलामुलींचे इतर जननांगे(प्राईवेट पार्ट्स) याबद्दल कधी काही बोललच जात नाही ना. आणि मग निर्माण होतो तो गैरसमज, थोडी भीती, थोडंसं त्याबद्दल जाणून घेण्याचा हव्यास, ही सारी विकृती निर्माण होते मग.
मग हा प्रश्र्न इथेच नाही थांबत हो, ते अगदी धुतलेले कपडे वाळू घालण्यापर्यंतही हेच चालतं. आई-आजींचं यावरचं बोलणं असतं मग..."अवं पोरी...!! थे निकर अन् ते ब्रा अंदरच टाकजो, ते तुया भावाले नाही त मंग बाबाले बी दिसाले नको..!!" ही झाली आमच्या खेड्यातील परिस्थिती, कुठे कुठे शहरातही हे बघायला मिळतंच कि. तिच परिस्थिती अजून महिन्यातील ते ४-५ दिवस ऐका लागते पाळी आल्यावर (कापडाच्या बाबतीत)...!! पण आपण मुलींनीच यावर जागरूकता आणणं गरजेचं आहे, स्वत:च्या प्रश्र्नांची उत्तरे शोधणं ही गरजेचं आहे आणि ती मिळत नसतील तर तेव्हा खुलके चर्चाही करणं महत्वाचंच आहे. मान्य आहे वेळ लागेल पण तरीही बदल घडतील...फक्त समोर येणं गरजेचं आहे, न भिता, न डगमगता, निसंकोचपणे अगदी....!!
आजच थोडंसं वाचण्यात आलं....
"Teach children biology and anatomy as it is. It should not be edited or left for *Time will teach*..!!" Bodily transformations and difficulty regarded to sexuality is most important for everybody to know. हे सगळं थोडंफार असावं आजच्या परिस्थितीला कारणीभूत, कारण असंच ऐकलं जातं कि "आता तू लहान आहे" हो पण मलाही कळायला हवंच कि...!!
जेव्हा जेव्हा गरज आहे तेव्हा आणि तिथेच हे सर्व माहीती होणं अति महत्त्वाचं आहे.
"Be the Alone WORRIOR not just an alone GIRL....!!"
~भाग्यश्री उमेश काळे
_#BK
अप्रतिम आहे नेहमीसारख...भाऊ जबरदस्त..
ReplyDelete🙌🏻👍🏻
Delete