मैत्री......





*मैत्री दोन मनामनांची .......!!*

*हे जग विविधरंगी नटेश्वर आहे ज्यात व्यक्ती एक पण भावना अनेक आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यात एक ना एक व्यक्ती अशी असते आणि असावीही जिचा खांदा अन् मांडी सदैव आपल्यासाठी नि आपलंही त्यांच्यासाठी रितं असावं, ज्यात आपलं सुख-दु:खाचं पात्र उघडं करता यावं. कितीही नाही म्हटलं तरी एखादा ही प्राणी(मानव) असा नसावा कि ज्याला "प्रेम" या सुंदर अन् जगावेगळ्या भावनेशी तिरस्कार ए. त्यातही मैत्रीप्रेम याची तर तर्हाच वेगळी, जिथे कुठलाही स्वार्थ नसतो फक्त नि फक्त एक अनोखा गंध असतो त्या "मैत्रीत" सदैव एकमेकांना साथ देत कधी प्रत्यक्षपणे तर कधी अप्रत्यक्षपणे सोबत राहून पाठीशीच आहे असंच वाटतं जणूकाही....!!*

*मला जर कुणी विचारलं, कि या जगात आई-बाबा नंतरचं निस्वार्थी प्रेम अन् नातं कोणतं .....?? तर मी म्हणेल "मैत्री"; कारण ही भावनाच अशी आहे जी दु:खाच्या दुष्काळातही आलेल्या अतोनात दु:खाला सुख नावाच्या झर्याने तहान भागवणारीच अगदी‌. हे असं अविश्वसनीय अन् अनोखं नातं नि बंध आहे दोन मनामनांचा, जो केवळ अनुभवता येतो उघड्या डोळ्यांनी बघता तर येतच नाही....!!*

*मैत्री हे नातंच असंय ज्यावर लिहायला गेलं तर शब्द ही अपुरे पडतात पण शब्दांना बंधनं असतात, पूर्णविराम असतोच असतो पण या निस्वार्थी मैत्रीत केवळ प्रेम नि विश्वासाने भरलेला अथांग सागरच जणू एक....!! शब्द कमी पडतील पण भावना मांडणं संपणार नाही. त्यातही मैत्री जर आयुष्य रसगंधमय करत एक एक पाऊल अजून खंबीरतेने ध्येयाच्या दिशेने टाकण्यास मदत करणारी असेल तर जीवन सोन्याहून पिवळे झाल्यासारखेच होते. तेव्हा आयुष्यात खरं समाधान लागतं जेव्हा आपल्याला समजून घेणारी एक गोड पण जीवनात आणखी वेगळंपण आणण्यासाठी थोडी पागलपंथी करणारी, कधी मधी खुप खुप भांडणारी पण ते भांडण प्रेमाचं अन् मग काहीही वेळ न दवडता पुन्हा sorry म्हणत ते बोलणारी, तेव्हा जीवन सार्थकच झालं जणू असंच काहीसं वाटतं. ..!*


*"मैत्री तुझी नि माझी अशीच अखंड नि अक्षय राहो,*
*अन् सोहळे दोघींच्या यशाचे भरभरून पाहता येवो.....!!"*



*-#BK*

Comments

Popular posts from this blog

एक नातं....

वाट पाहताना..........!

गणित आयुष्याचं........