मासिक धर्म....!!
लहानपणीपासनंच अगदी, जेव्हा काहीही समजत नव्हतं, तेव्हापासून तिच्याठायी कटकट लागलीय भारी,
अन् जेव्हा कुठं तिला समजायला लागलं अन् स्वछंदी होऊन ती जगायला लागली मग तिची मासिक पाळी शी भेट झाली न्यारी,
ज्यामुळे बाईला बाईपण येत पुढे मातृत्व बहाल होतं अन् विश्र्वाची नवनिर्मिती देखील होती,
पण तरीही हे पितृसत्ताक लोकं त्याला कुणी कावळा शिवला, लागाचं नाय, दुर झाली, अपवित्र हाय, अशी नावे का ठेवती,
काही तर सेक्सच्या आधीन झालेले अवलिया असतात, जे या काळात 'आचारसंहीता' लागलीय, असेही म्हणती,
पण त्या बिचारीला त्रास सहन करावा लागतोय, ओटीपोटासह कळा लागल्याय सार्या, तरीही काही त्याला मदतीचा हात न देती,
पाळी आल्यावर आमच्याकडे 'लागाचं नाय' असं म्हणत ते पाच दिवस unlock करत तिला कुठेकुठे बाहेरही ठेवती,
पुरूषांनी जर अशावेळी विचारलं अन् त्यात बाबांनी काही काम सांगितलं तर त्यांना 'हो' म्हणत ते करावयास घ्यावं कि त्यांना सांगावच, एवढ्यात तिकडनं आई डोळा काढून बघती,
पॅड, नॅपकिन, menstrual कप विकत घेताना, एरवी मोठ्याने बोलणारे आम्हीही, पण इथे का हो आमची पिढी दचकती,
पण सेक्स सुरक्षित व्हावा यासाठी मात्र मेडीकलच्या एका कप्प्यात असलेल्या त्या कंडोम वर कधी मधी तुटून पडती,
या काळात तिला आधार द्यावा; पण नाही..!! आम्ही पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये जगतोय ना, तर मग तिचे दु:ख ते तिचेच असती,
म्हणे आम्ही शिक्षित आहोत; पण का मग..?? "मासिक पाळी" ला तुम्हीच तिला त्रास देत, कधी छळ काढत, "मानसिक पाळी" म्हणावं लागती,
-भाग्यश्री उमेश काळे
Khup chhan Bhageshri 👍
ReplyDeleteKhupach chhan bhagu 👌👍
ReplyDelete