*लग्न नावाच्या सुंदरतेत तयार होणार्या नात्याला कधी कधी हुंडा नावाचा गिधाड लागल्याने निर्माण झालेली परीस्थिती.......!!*
लग्न नावाच्या सुंदरतेत तयार होणार्या नात्याला कधी कधी हुंडा नावाचा गिधाड लागल्याने निर्माण झालेली परीस्थिती.......!!*
*कधी कधी तर वाटते, अन् फार राग येतो कि हे लग्न चाललंय कि बाजार......?? लग्नाच्या नावाखाली फार फार पसाराच मांडून ठेवलाय जणू काही लोकांनी तर... त्यांना तर माणूस म्हणायची ही लाज वाटते. कारण मुलगी तर मुलगी ही द्यावी अन् वरून हुंडा ही द्यावा.... म्हणजे दुकानासारखच काम झालं हे तर. अन् त्यातही मुलगा जर नोकरीवाला असेल तर मग विचारूच नका ...पाच लाख, दहा लाख जसा लिलावच चाललाय.*
*कोण्या कोण्या समाजात तर काही वेगळाच प्रकार चाललेला दिसतो, जसं कि दुकानात जाऊन एखादी वस्तु घ्यायला जातो तसंच हा कार्यक्रम चालतो तो म्हणजे मुलगी बघण्याचा ...हो मान्य आहे की, जिच्यासोबत सारं आयुष्य घालवायचं आहे तिला पारखनं लई महत्त्वाचं आहे, पण मग हे करत असताना नटून थाटून जाणं तेही पाहुण्यांसमोर फार द्वेष वाटतो या गोष्टीचा, त्यातही त्यांना आवडली तर ठिक नाहीतर ते नटनं थटनं गेलं चुल्यात.....!! तेव्हाही बरेच प्रसंग असतात, पाहुण्यांसमोर चालून दाखवनं, त्यांना हात दाखवनं, पाय दाखवनं, डोक्यावर पदर घेणं, मान्य आहे कि संकृती ला जपायचं आहे, मग आम्हीही ती जपण्याचा प्रयत्न करतोच आहे; पण हे थोडं जास्तच होतं राव, अन् फार फार चिडही येते कि यार आपण मुलगी असण्याचा कोणता गुन्हा केलाय; पण विचार केल्यावर फार अभिमानही वाटतो मुलगी असण्याचा कारण मुलगी आहोत हा गुन्हा नाहीए तर गुन्हा हा आहे कि आजही आम्ही शिकून मोठे झालोत, विचारशील झालोय पण मात्र ह्या हुंड्याच्या बाबतीत असणारे लोकांचे विचार अजूनही नाही बदललेत... म्हणूनच कधी कधी तर कळत नाही कि ईथे विचारांनी साजेसी मुलगी बघत आहेत हे लोकं कि दिसायला सुंदर, देखणी बघताहेत केवळ.*
*अजूनही खेड्यात अनेक महिलांना अत्याचार सहन करावा लागतो आहे आणि बिचार्या त्या निमुटपणे सहन ही करून घेतात. पण आजची परिस्थिती थोडी बदललीय कि आजकालच्या मुली हे सहन करत नाहीये म्हणूनच कि काय तलाक हा प्रश्र्न दिवसेंदिवस वाढत आहे. आणि त्यांचही काय चुकलं म्हणावं कारण अन्याय महिलांनीच का सहन करावा अन् तेही त्यांची काही चुक नसतानाही.....??*
*असंही बघितलंच जातं कि घरी प्रचंड श्रीमंत आहे तरीही विचारांनी मात्र तेच बुरसटपणाची किड अजूनही लागलीच आहे कि तिने घरीच राहावं, घरीच हवं ते तिला मिळत असताना मग काय गरज आहे बाहेर जाण्याची.....?? ही देखील मानसिकता आहे, अहो पण तीही सजीव आहे तिच्याही काही ईच्छा आकांक्षा असतील, तिलाही बाहेर फिरावं वाटत असेल, तिलाही मनसोक्त राहावं वाटत असेल....!! पण नाही हे तर काहींच्या पचनीच पडत नाही. मग काहीचं यावरचं फारच सुंदर अन् गोड बोलणं असतं, ते काय आहे ना आमच्या घरचीला बाहेर निघायची आवडच नाहीये, तिला न बाहेर फिरण्याचा फारच कंटाळा येतो.... !! अरे पण हे सांग न तिला बाहेर निघालेलं तुलाच जमत नाही ते..मग का म्हणून तिला मध्ये टाकावं बरं...??*
*अन्यायही तिनेच सहन करावा अन् शेवटी ते सहन करण्यापलीकडे गेला तर मग जीवन संपवावे असा चुकीचा विचारही तिच्या डोक्यात येतो. मान्य आहे की आत्महत्या करनं हा शेवटचा उपाय नसतोच, कारण हे जीवन अनमोल आहे याची गोड जाणीव करत मिळालेलं आयुष्य हसतमुखाने अन् आनंदाने जगावं. पण तरीही ती बिचारी हा सर्व विचारही करतेच करते पण तिच्यावर होणारा अन्याय तिला एखाद्या रोगासारखं आतून बाहेरून पोखरून टाकतो पण तरीही हे #चोद लोकं भावना नसल्यासारखे वागतात तिच्यासोबत, प्राणी ही उपमाही शोभत नाही लेकाच्यांना, जसा कि कोणता खेळ चाललाय जणू......असाच प्रकार बघतो आपण बर्राचदा जेव्हा समाजात एक एक पाऊल टाकत वाटचाल करत असतो तेव्हा......!!*
*-भाग्यश्री उमेश काळे*
Comments
Post a Comment